मुंबई, 17 जुलै : आपल्याकडे खवय्यांची कमी नाही. शाकाहारी (Vegetarian) असो किंवा मांसाहारी (Nonvegetarian). खाण्याची आवड असणारे आणि खाद्यपदार्थातील वैविध्य शोधणारे खूप लोक असतात. परंतु सध्याच्या काळात केवळ चवीकडे न पाहता पदार्थांची पौष्टिकता (Healthy Food) पाहणारेही अनेक लोक आहेत. अशाच मांसाहारी लोकांसाठी आज आम्ही काही प्रकारच्या मासे (Healthy And Tasty Fish) सांगणार आहोत. जे खायला चविष्ट आणि तितकेच पौष्टिक असतात. हे मासे आपल्या आरोग्यासाठी (Fish For Good Health) फायदेशीर आहेत. सॅल्मन (Salmon Fish) सॅल्मनमध्ये ओमेगा ३ असते आणि ते हृदयाचे आरोग्य सुधारते. फार्मेड सॅल्मन जंगली सॅल्मनपेक्षा स्वस्त आहे. जंगली सॅल्मनमध्ये व्हिटॅमिन आणि खनिजांचे प्रमाण जास्त असते. ई टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, असोसिएशन ऑफ रिप्रोडक्टिव्ह हेल्थ प्रोफेशनल्सच्या मते, सॅल्मन फिश जितका मोठा आणि जुना असेल तितका जास्त पारा असेल. म्हणून ताजे सॅल्मन खाण्याचा सल्ला दिला जातो. सार्डिन (Sardines Fish) हा एक तेलकट मासा आहे. ज्यामध्ये व्हिटॅमिनचे प्रमाण जास्त आहे. सार्डिन अधिक पोषण देतो. कारण हा मासा त्वचा आणि हाडांसह खाल्ला जातो. याचे अनेक फायदे आहेत. हृदयरोगांपासून संरक्षण, विशिष्ट प्रकारच्या कर्करोगापासून बचाव आणि हाडे मजबूत करण्यास हा मासा मदत करतो. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते.
Avocado peel benefits : अॅव्होकाडो खाल्ल्यानंतर त्याची साल फेकून देता? हे फायदे वाचून थक्क व्हालक्रेफिश (Crayfish Fish) क्रेफिश हे लहान लॉबस्टरसारखेच आहे. शिजवल्यावर ते चमकदार लाल होतात आणि खाताना रसदार लागतात. हा मासा निरोगी प्रजातींपैकी एक आहे आणि त्यात फॅट्सचे प्रमाण कमी असते. क्रॉफिशमध्ये व्हिटॅमिन बी आणि झिंक, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि कॅल्शियम यांसारखी खनिजे जास्त असतात. ट्यूना (Tuna Fish) ट्यूना मासा व्हिटॅमिन बी 12 आणि डी ने समृद्ध आहे आणि कॅल्शियम आणि लोहाने भरलेले आहे. त्यात कमी चरबीयुक्त प्रोटीन असतात. लहान मुले आणि गर्भवती महिलांना ट्यूना फिशच्या हलक्या जाती खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र कॅन केलेल्या ट्यूनामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते म्हणून जर तुम्ही तुमच्या मिठाचे सेवन नियंत्रित करत असाल तर कॅन केलेला ट्यूना हा आरोग्यदायी पर्याय असू शकत नाही. ट्राउट (Trout Fish) ताज्या पाण्यातील ट्राउट मासा खाणे नेहमीच सर्वोत्तम पर्याय असतो. या माशामध्ये ओमेगा-३ फॅट्स असतात. ज्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदा होतो. Diet Tips: 40 वर्षानंतर आहाराची काळजी घ्याच; एक्सपर्टसने सांगितलेल्या या 3 सोप्या टिप्स वापरा कॅटफिश (Catfish Fish) कॅटफिश विविध प्रकारचे आरोग्य फायदे देते. उत्तम चवीबरोबरच हा मासा आपल्या अनेक पोषण गरजा पूर्ण करण्यास मदत करतो. हा मासा जीवनसत्त्वे आणि हेल्दी फॅट्सने समृद्ध आहे. कॅटफिशमध्ये कमी-कॅलरी सामग्री आणि फॅट्स असते. त्यात ओमेगा 3 आणि ओमेगा 6 सारखी हेल्दी फॅटी ऍसिडस् आहेत. त्याचबरोबर व्हिटॅमिन बी 12 देखील आहे, जे आपल्या शरीराच्या मज्जासंस्थेला मदत करते. त्यामुळे आपल्या आहारात कॅटफिश समाविष्ट करणे हा एक आरोग्यदायी पर्याय आहे. (या लेखात दिलेली माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.)