पुण्यात सोमवारी (21 सप्टेंबर) दिवसभरात 854 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे.
नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर : देशभरात सणासुदीचा काळ आहे. आधी नवरात्र, नंतर दसरा आणि आता दिवाळी म्हणजे लोक घराबाहेर पडत आहेत, उत्सव साजरे करत आहेत. कोरोना विषाणू (coronavirus) आपल्याला काही करू शकत नाही, असंच आता लोकांना असं वाटायला लागलं आहे. त्यामुळे ते सरकारनं सांगितलेले सावधगिरीचे उपायही लोक पाळत नाहीत. त्यामुळेच हळूहळू कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तज्ज्ञांच्या समितीने सण सुरू होण्यापूर्वीच या काळात आणि हिवाळ्यात रुग्ण संख्या वाढू शकते असं सांगितलं होतं. तज्ज्ञांच्या समितीच्या अंदाजानुसार हिवाळा आणि सणांनंतर राजधानी दिल्लीत दररोज 14 हजारांहून अधिक रुग्ण सापडू शकतात. राजधानी दिल्लीत 23 ऑक्टोबरनंतर सातत्याने रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. 23 तारखेला रुग्णांची संख्या 4048 तर 24 ला 4116 आणि 25 ऑक्टोबरला ती 4136 इतकी झाली. 27 ऑक्टोबरला हीच संख्या वाढून 4853 आणि 28 ऑक्टोबरला 5673 पर्यंत पोहोचली आहे. या काळात फक्त 26 ऑक्टोबरला रुग्णसंख्या कमी होऊन 2832 झाली होती. हे वाचा - नवरात्रातल्या गर्दीमुळे राजधानीत Corona ची दुसरी नव्हे तिसरी लाट केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी सांगितलं, गेल्या पाच आठवड्यांत कोरोना विषाणू संक्रमित रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. भारताचा रिकव्हरी दर 90.62 टक्के आहे आणि तो सतत वाढत आहे ही गोष्ट चांगली आहे. या आधी 1 लाखापासून 10 लाख लोक कोरोनातून बरे होण्यासाठी आपल्याला 57 दिवस लागले होते पण नुकत्याच आलेल्या आकडेवारीनुसार 10 लाख लोक केवळ 13 दिवसांत या आजारातून बरे झाले आहेत. पण गेल्या 24 तासांत मृत्यु झालेल्या नवीन रुग्णांचं प्रमाण 58 टक्के असून हे रुग्ण महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, छत्तीसगड आणि कर्नाटक या पाच राज्यातील आहेत. केरळ, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक आणि दिल्लीत उत्सव आणि सणासुदीमुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. हे वाचा - अरे देवा! आता कोरोना रुग्णांमधील Antibody व्हायरसऐवजी शरीरावरच करतायेत अटॅक नवी दिल्लीतील अपोलो रुग्णालयातील डॉक्टर एस. चॅटर्जी म्हणाले, “गेल्या काही आठवड्यांत सण असल्याने लोक एकमेकांना भेटत आहेत. एकत्र येत आहेत. त्यामुळे संसर्ग वाढल्याचं लक्षात येतं आहे. पण सणांनंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी दिल्लीतील हॉस्पिटल सज्ज आहेत. कोरोनाबद्दल बरीच माहिती आता उपलब्ध झाली आहे”