नवरात्रातल्या गर्दीमुळे राजधानीत Corona ची दुसरी नव्हे तिसरी लाट; आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता

नवरात्रातल्या गर्दीमुळे राजधानीत Corona ची दुसरी नव्हे तिसरी लाट; आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता

विशेषतः सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बाजारातली गर्दी वाढत असतानाच ही Covid-19 ची तिसरी आणि मोठी लाट असू शकते, अशी चिंता राजधानीच्या आरोग्यमंत्र्यांनीच व्यक्त केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर : Coronavirus चे नवे रुग्ण देशात कमी होत असतानाच काही राज्यांत आणि शहरात मात्र दैनंदिन रुग्णसंख्या पुन्हा वाढायला लागली आहे. विशेषतः सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बाजारातली गर्दी वाढत असतानाच ही Covid-19 ची तिसरी आणि मोठी लाट असू शकते, अशी चिंता राजधानीच्या  (Coronavirus 3rd wave) आरोग्यमंत्र्यांनीच व्यक्त केली आहे.

राजधानी दिल्लीत (Coronavirus in delhi) मुंबईप्रमाणेच मोठ्या संख्येने रुग्णवाढ झाली. पण ती वेळीच रोखण्यात यश आलं. त्यानंतर लॉकडाऊन संपताच पुन्हा एकदा संख्या वाढली, ती कमी होते आहे हे लक्षात येत असतानाच नवरात्र, दुर्गापूजा आणि दसऱ्यानिमित्ता लोक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले, प्रवास करू लागले आणि दिल्लीत आता रुग्णसंख्या वाढू लागली आहे. ही कोरोनाची तिसरी लाट असू शकते, असं खुद्द दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंदर जैन यांनी म्हटलं आहे.

बुधवारी दिल्लीत एका दिवसात 5600 नवे कोरोनारुग्ण आढळून आले. ही एका दिवसात सापडलेली उच्चांकी संख्या आहे. 40 रुग्णांचा मृत्यूही नोंदवला गेला. त्यामुळे ही कोरोना साथीची तिसरी लाट असू शकते, असं जैन म्हणाले. ऋतू बदलामुळे दिवसाचं तापमान कमी होऊ लागलं आहे आणि त्यात दिल्लीतलं प्रदूषणही प्रचंड वाढलं आहे. या कारणानेही अधिक रुग्णसंख्या वाढत असेल, असं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

दिल्ली सरकारने चाचण्यांचा वेग आणि संख्या वाढवली आहे. कोविड रुग्णांच्या नातेवाईक आणि संपर्कात आलेल्यांचीही चाचणी करण्यात येत आहे. त्यामुळे अधिकाधिक रुग्णांचं निदान होत आहे. पण लवकर निदान झाल्यामुळे साथ पसरण्याचा धोका कमी होईल आणि उपचारसुद्धा लवकर सुरू होतील, अशी अपेक्षा आहे.

अनेक देशांत नवी लाट, फ्रान्समध्ये पुन्हा लॉकडाऊन

जगात अमेरिकेसह अनेक देशांमध्ये कोरोना साथीची दुसरी किंवा तिसरी लाट आली आहे. बुधवारीच फ्रान्सनेदेखील या नव्या लाटेची दखल घेत नव्याने लॉकडाऊन जाहीर केला. कोरोनातून बरे होण्याचा म्हणजेच रिकव्हरी रेट अत्यंत कमी आणि संक्रमणाचा वेग दुप्पट असल्यानं प्रशासनाला पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करावी लागली आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी बुधवारी आपल्या देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर केला आहे.

महाराष्ट्रात आलेख उतरता

महाराष्ट्रात सध्या तरी कोरोना साथीचा वेग आटोक्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात घसरणीला लागलेला कोरोना रुग्णांचा आलेख कायम आहे. बुधवारी राज्यात 8 हजार 430 रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या ही 14 लाख 86 हजारांवर गेली आहे. त्यामुळे राज्याचा Recovery Rate हा 89.53 एवढा झाला आहे. दिवसभरात 6 हजार 738 रुग्णांची भर पडली तर 91 जणांचा मृत्यू झाला. राज्याचा मृत्यू दर हा 2.62 एवढा झाला आहे. तर राज्यात सध्या उपचार घेण्याऱ्या रुग्णांची संख्या 1 लाख 28 हजारापर्यंत खाली आली आहे.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: October 29, 2020, 2:47 PM IST
Tags:

ताज्या बातम्या