JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Eye Strain : स्क्रीनच्या वापराने डोळ्यांवर ताण आलाय? हे आय मास्क डोळ्यांचा थकवा क्षणात करतील दूर

Eye Strain : स्क्रीनच्या वापराने डोळ्यांवर ताण आलाय? हे आय मास्क डोळ्यांचा थकवा क्षणात करतील दूर

अनेक वेळा काम करताना डोळे थकतात आणि त्यांना तात्काळ आराम मिळण्याची गरज भासते. हे घरगुती उपाय डोळ्यांवरचा ताण कमी करण्यासाठी सर्वोत्तम आहेत. शिवाय यामुळेडोळ्यांभोवतीची त्वचाही टवटवीत होईल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 31 जुलै : आजकाल ऑफिसच्या कामापासून ते शाळा-कॉलेजपर्यंतची कामेही लॅपटॉपवर होत आहेत. तासन्तास स्क्रीनकडे टक लावून पाहिल्याने डोळ्यांना थकवा येणे सामान्य आहे. पण थकलेल्या डोळ्यांनी काम करणं किती कठीण आहे हेदेखील तुम्हाला माहीतच असेल. अशा परिस्थितीत डोळ्यांचा ताण दूर करण्यासाठी आपण काही घरगुती उपायांची मदत घेऊ शकतो. यामुळे डोळ्यांचा थकवा तर दूर होईलच, शिवाय डोळ्यांभोवतीची त्वचाही टवटवीत होईल. चला तर मग जाणून घेऊया आपण आपल्या थकलेल्या डोळ्यांना काही मिनिटांत कसे ताजे करू शकतो. तुळस आणि पुदिना मास्क डोळ्यांचा थकवा दूर करण्यासाठी तुळस आणि पुदिना वापरा. यासाठी तुळस आणि पुदिन्याची पाने रात्रभर पाण्यात ठेवा आणि दुसऱ्या दिवशी या पाण्यात कापूस भिजवून डोळ्यांवर ठेवा. असे केल्याने डोळ्यांचा थकवा दूर होईल आणि डोळ्याभोवतीची त्वचाही तणावमुक्त होईल.

Mattress for beauty sleep : कोणत्या ब्युटी प्रोडक्टपेक्षा कमी नाही ही खास मॅट्रेस; झोपेतच खुलवते तुमचं सौंदर्य

संबंधित बातम्या

गुलाब जल मास्क गुलाबपाणी डोळ्यांतील कोरडेपणा आणि थकवा दूर करण्याचे काम करते. यासाठी गुलाब पाण्यात कापूस बुडवून हा कापूस काही वेळ डोळ्यांवर ठेवावा. या मास्कमुळे डार्क सर्कलची समस्यादेखील दूर होईल आणि डोळ्यांची जळजळही दूर होईल. टी बॅग आय मास्क डोळ्यांचा थकवा दूर करण्यासाठी टी बॅग सर्वित्तम उपाय आहे. ही टी बॅग काही काळ फ्रीजमध्ये ठेवा. यानंतर बॅग सध्या पाण्यामध्ये बुडवा आणि डोळ्यांवर ठेवा. ही टी बॅग डोळ्यांवर ठेवण्यापूर्वी हलक्या हातांनी दाबा. त्यामुळे त्यातील अतिरिक्त पाणी निघून जाईल. या टी बॅगचा वापर केल्याने डोळ्यांचा थकवा तर दूर होईलच त्याचबरोबर डार्क सर्कलदेखील कमी होतील. Hair Care Tips : पावसाळ्यात केसातील कोंड्यामुळे त्रस्त आहात? करा हे घरगुती उपाय बटाटा आणि पुदिना मास्क बटाटा आणि पुदिना मास्क डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यासाठी बटाटे सोलून घ्या. यानंतर बटाटे आणि पुदिन्याची पाने एकत्र बारीक करून घ्या आणि नंतर ही पेस्ट दाबून त्याचा रस काढा. आता हा रस कापसाच्या मदतीने डोळ्यांवर लावा. असे केल्याने डोळ्यांचा थकवा सहज दूर होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या