मुंबई, 14 जुलै : गेल्या काही दिवसांपासून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले एलन मस्क ट्विटर विकत घेणे किंवा न घेणे यावरून खूप चर्चेत आहेत. पण आता ते त्यांच्या एका ट्विटमुळे चर्चेत आले आहेत. आपल्या नवीन ट्विटमध्ये त्यांनी चांगल्या झोपेचे रहस्य सांगितले आहे. ते त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर अनेकदा काही महत्वाच्या गोष्टी शेअर करत असतात. कधी ते व्यवसायाच्या नवनवीन युक्त्या सांगतात तर कधी तरुणांसाठी प्रेरणादायी लिहितात. यावेळी एलन मस्क यांनी एक महत्वाचा सल्ला दिला आहे. त्यांनी दिलेल्या या सल्ल्याचा सर्वांनाच फायदा होणार आहे. एलन मस्क यांनी ट्विट करून सांगितले की, जर तुम्हाला चांगल्या दर्जाची झोप घ्यायची असेल (Elon Musk Sleeping Advice) तर तुमची उशी 3 ते 5 सेंटीमीटर उंचीवर सेट करा. याशिवाय जेव्हा तुम्ही झोपायला जाल तेव्हा तीन तास आधी काहीही खाऊ नका. https://twitter.com/elonmusk/status/1546518224887496705
Sitting Work : डेस्क जॉब करणाऱ्यांना जास्त असतो हृदयविकाराचा धोका, तज्ज्ञांनी सुचवले हे उपायअशा प्रकारे मस्क यांनी दिले प्रश्नाला उत्तर एलन मस्कच्या ट्विटवर, मिस्टर बीस्ट या नावाने प्रसिद्ध असलेल्या अमेरिकन यूट्यूबर जिमी डोनाल्डसनने विचारले की, मस्कने सांगितलेल्या या दोन गोष्टी मला कशा प्रकारे मदत करतील? हे कोणीतरी कृपया मला सांगाल का? या प्रश्नावर स्वतः एलन मस्क यांनी उत्तर दिले. त्यांनी दुसरे ट्विट केले आणि लिहिले की, ‘या दोन उपायांमुळे अॅसिड रिफ्लक्सची समस्या कमी होईल. अॅसिड रिफ्लक्समुळे झोपेच्या गुणवत्तेवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. वास्तविक, अॅसिड रिफ्लक्स हा अॅसिडिटीचा एक प्रकार आहे. जेव्हा आपण अन्न खातो तेव्हा पोटात असलेले अॅसिड उलट दिशेने वर जाऊ लागते. यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. साहजिकच यामुळे झोपेचे इतर त्रासही होऊ शकतात.’ 2 मिनिटांत प्यायला संपूर्ण बाटलीभर Digestive Medicine; फक्त 100 रुपयांसाठी गमावला लाखमोलाचा जीव 6 तास झोपतात एलन मस्क एक वर्षापूर्वी एलन मस्कने सांगितले की, ते रात्री 9 तास झोपतात. इतके दिवस झोप कमी करण्याबाबतही ते बोलत होते. वर्षभरानंतर ते आता फक्त 6 तास झोपतात आणि झोपेचा दर्जा सुधारल्याचेही त्यांनी मान्य केले आहे. काही दिवसांपूर्वी एका अमेरिकन पॉडकास्टवर मस्क यांनी सांगितले की, आता ते केवळ 6 तास झोपतात. पण यापेक्षा कमी झोपल्यास उत्पादकता म्हणजेच प्रॉडक्टिव्हिटी कमी होते.