मुंबई, 14 ऑगस्ट : आजकालच्या धावपळीच्या आयुष्याच्या आपल्या शरीरावर मोठा परिणाम होत असतो. बिझी शेड्यूलमुळे आहाराकडे होणारे दुर्लक्ष आणि अनियमित जीवनशैली यांचा परिणाम आपल्या प्रजनन क्षमतेवर देखील होतो. पर्यायाने स्त्री-पुरूष दोघांपैकी एकाची देखील प्रजनन क्षमता कमकुवत असेल तर पालक होण्यात खूप अडचणी येतात. सध्याच्या काळात अनेकांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. यामुळे वैवाहिक जीवनात कटुता निर्माण होते. याबाबत प्रसिद्ध आरोग्य तज्ञ निखिल वत्स यांनी झी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार माका रूट महिला आणि पुरुष दोघांची प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी प्रभावी उपाय ठरू शकते. माका रूट हे एक प्रकारचे कंदमूळ आहे जे जमिनीत वाढते. या भाजीची पाने क्रीमी, जांभळ्या, पिवळ्या किंवा काळ्या रंगाची असतात. ही भाजी खाल्ल्याने महिला आणि पुरुषांना दोघांनाही अनेक प्रकारचे फायदे मिळतात. माका रूट खाण्याचे फायदे पुरुषांसाठी देखील माका रूट खूप प्रभावी असते. याचा पुरुषांच्या हार्मोनल आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. ही भाजी खाल्ल्याने पुरुषांमध्ये शुक्राणूंची निर्मिती होते, तसेच गतिशीलता आणि प्रमाण सुधारते. पर्यायाने पुरुषांच्या प्रजनन क्षमतेसोबतच टेस्टोस्टेरॉनची पातळी देखील वाढते.
झपाट्याने वजन कमी झाल्यास दुर्लक्ष करू नका, डिप्रेशनसोबत कॅन्सरचाही वाढतो धोकामहिलांच्या लैंगिंक आरोग्यासाठी माका रूट खूप प्रभावी ठरते. महिलांची मनःस्थिती सुधारण्यासाठी आणि डिप्रेशन व एंग्जाइटी कमी करण्यासाठी माका रूट खूप परिणामकारक आहे. मूड सुधारल्याने लैंगिक कामवासना वाढते आणि लैंगिक आरोग्य सुधारते. तणावावापासून आराम मिळवण्यासाठी देखील माका रूट उपयोगी असते. माका रूटचा महिला आणि पुरुषांच्या मूडवर सकारात्मक प्रभाव पडतो. त्यामुळे त्यांची स्वतःची चिंता आणि तणाव कमी होण्यास मदत होते. तसेच ही भाजी खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. त्यामुळे शरीराची सक्रिय राहण्याची क्षमता वाढते. फक्त फायदेच नाही तर जास्त पाणी पिण्याचे गंभीर तोटेही; शरीरावर होतात हे भयंकर परिणाम स्टॅमिना वाढवण्यासाठी माका रूट खूप फायदेशीर ठरते. अलीकडील काही अभ्यासातून असे दिसून आले आहे की मका रूट खाल्ल्याने स्टॅमिना वाढतो आणि लांब पल्ल्याची रेसिंग आणि कठोर कामाच्या दरम्यान स्नायूंचा विकास होणार मदत होते.