JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Coronavirus चा धोका : स्वच्छतेसह असा सुरक्षित आहार घ्या, WHO चा सल्ला

Coronavirus चा धोका : स्वच्छतेसह असा सुरक्षित आहार घ्या, WHO चा सल्ला

सुरक्षित खाद्यपदार्थांबाबत जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) काही गाइडलाइन्स जारी केल्यात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 मे : कोरोनाव्हायरसपासून (coronavirus) बचाव करण्यासाठी लोकं स्वत:ची जास्त काळजी घेऊ लागलेत. वारंवार हात धुणं, मास्क आणि ग्लोव्हज घालणं, सॅनिटायझर वापरणं हा आता दैनंदिन जीवनाचा भाग झाला आहे. मात्र तरी खाद्यपदार्थांमार्फत (food) तर कोरोनाव्हायरसचा धोका नाही ना, अशी चिंता प्रत्येकालाच आहे. खाद्यपदार्थांमार्फत कोरोनाव्हायरस पसरतो असे पुरावे अद्याप तरी नाही, असं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे. मात्र तरीही खबरदारी म्हणून सुरक्षित खाद्यपदार्थांबाबत जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) काही गाइडलाइन्स जारी केल्यात.

संबंधित बातम्या

स्वच्छता राखा कोरोनाव्हायरसपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी जसं तुम्ही वारंवार हात धुत आहात, याच नियमाचा अवलंब तुम्ही स्वयंपाक करताना आणि खातानाही करायला हवा. स्वयंपाक करण्यापूर्वी आणि केल्यानंतर हात स्वच्छ धुवा. हे वाचा -  जे आतापर्यंत झालं नाही ते कोरोनानं केलं, लाखो लोकांना ‘या’ वाईट सवयीतून सोडवलं शिवाय स्वयंपाक करत असलेली जागा आणि स्वयंपाकासाठी वापरत असलेली भांडी, उपकरणं स्वच्छ ठेवा. जेणेकरून यावरील हानिकारक असे बॅक्टेरिया राहणार नाहीत. शिजवलेले आणि न शिजवलेले पदार्थ वेगवेगळे ठेवा मासे, मांस शिजवलेले नसतील तर ते शिजवलेल्या पदार्थांपासून वेगळं ठेवा. त्यांच्यासाठी वेगळा कटिंग बोर्ड, चाकू वापरा. कच्चं मांस आणि सीफूडमध्ये घातक असेल सूक्ष्मजीव असता, त्यामुळे ते तुम्ही लगेच शिजवणार नसाल तर एका वेळ्या डब्यात बंद करून इतर पदार्थांपासून दूर ठेवा. अन्नपदार्थ नीट शिजवा कच्चं मांस, मासे याप्रमाणेच भाज्याही नीट शिजवून घ्या, यामुळे ते खाल्ल्यानंतर सूक्ष्मजीवांमुळे तुमच्या आरोग्याला धोका पोहोचणार नाही. उरलेलं अन्न फ्रिजमध्ये ठेवलं असेल तर ते पुन्हा खाताना नीट गरम करा. 70 अंश सेल्सिअस तापमानावर शिजवेले अन्नपदार्थ खाण्यासाठी सुरक्षित असतात. अन्नपदार्थ योग्य तापमानात ठेवा एखादा पदार्थ रूम टेम्परेचरमध्ये 2 तासांपेक्षा जास्त वेळ ठेवू नका. या तापमानात सूक्ष्मजीवांची झपाट्याने वाढ होते. त्यामुळे 5°C कमी आणि 60°C पेक्षा जास्त तापमानात अन्नपदार्थ ठेवणं सुरक्षित आहे. यामुळे सूक्ष्मजीवांची वाढ थांबते किंवा वेग मंदावतो. स्वच्छ पाणी आणि पदार्थ वापरा भाज्या, फळं, मांस किंवा असं जे काही तुम्ही खरेदी करा, ते सुरक्षित आणि ताजे असल्याची खात्री करा. घरी आणल्यानंतर नीट स्वच्छ पाण्यात धुवून घ्या. काही भाज्या आणि फळं कच्ची खाल्ली जातात त्यामुळे ते धुताना जास्त काळजी घ्या. पॅक फूड घेताना त्यांची एक्सपायरी डेट तपासा. संकलन, संपादन - प्रिया लाड हे वाचा -  अरे बापरे! शहरात तब्बल 334 कोरोना सुपर स्प्रेडर; नकळत पसरवत आहेत व्हायरस

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या