JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / ...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO

...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO

माणसांनाही समोर मासे दिसले की त्यांना खाण्याचा विचार करतात मग एखाद्या कुत्र्याने माशाचा जीव (dog and fish video) वाचवला असं म्हटल्यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 सप्टेंबर : मासे (fish) म्हटलं की कित्येकांच्या तोंडाला पाणी सुटतं. असे बरेच व्हिडीओ आपण पाहिले आहेत. ज्यामध्ये रस्त्यावर माशांचा खच पडलेला दिसला की लोक त्यावर तुटून पडतात. अगदी बहुतेक लोकांच्या समोर एखादा मासा तडफडत असेल तर सर्वात आधी त्याला खाण्याचा विचारच मनात येईल ना की त्याचा जीव वाचवण्याचा. मासे पाहून माणसांची अशी अवस्था होत, तर मग माशांसाठी आसुसलेल्या कुत्रा-मांजरांचं काय होत असेल याची कल्पना आपण करूच शकतो. जिथं माणसांच्या भावना मरतात, माणसं दया दाखवू शकत नाही तिथं आपण प्राण्यांकडून अशी अपेक्षा तर करूच शकत नाही असंच आपल्याला वाटतं. मात्र आपल्याला खोटं ठरवलं आहे ते एका कुत्र्याने. ज्याने माणसांनीही शरमेनं मान खाली झुकवावी असं असं महान कार्य केलं आहे. एका कुत्र्याने चक्क माशाचा जीव वाचवला आहे. हे ऐकूनच थोडं विचित्र वाटेल मात्र खरं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल  होतो आहे.

संबंधित बातम्या

बॅक टू नेचर ट्विटर युझरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडिओत पाहू शकता. एका टबमध्ये काही मासे जिवंत आहेत. मात्र टबमध्ये पाणी नाही. पाण्याअभावी मासे तडफडत आहेत. टबमधील तडफडणारे मासे पाहून एक कुत्रा त्या टबजवळ जातो. आधी त्या माशांकडे एकटक पाहतो आणि त्यानंतर अलगद त्यांना आपल्या तोंडात पकडतो. मात्र हे मासे तो तोंडात धरून खात नाही तर त्यांना पाण्यात सोडतो. हे वाचा -  तहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है! तडफडणाऱ्या माशांना पाहून कुत्र्याला त्यांची दया आली. कुत्रा भावुक झाला. त्याने या माशांना आपलं शिकार न बनवता, अगदी समंजसपणे, शांतपणे, प्रेमाने त्यांना पाण्यात सोडलं. खरंतर व्हिडीओ पाहिल्यानंतरही विश्वास बसत नाही. या कुत्र्यांचं सोशल मीडियावर सर्वांनी कौतुक केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या