Home /News /viral /

तहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है!

तहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है!

4 लाखहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. अक्कल मोठी की म्हैस असाही प्रश्न अनेक युझर्सनी विचारला आहे.

    नवी दिल्ली, 27 सप्टेंबर: आपण अनेकवेळा माकड आणि मांजर स्वत: नळ सुरू करून पाणी पित असल्याचे किंवा वाया जात असणारं पाणी अडवत असल्याचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील इतकच काय अगदी लहानपणापासून तहानलेला कावळ्याची गोष्ट देखील ऐकली असेल. अशीच एक तहानलेली म्हैस आणि तिचं रेडकू पाण्याच्या शोधात फिरताना दिसले. या म्हशीला जवळच हॅण्डपंप दिसला त्यातून हपाणी काढण्यासाठी ती प्रयत्न करू लागली. शिंगाच्या मदतीनं ती हॅण्डपंप वर-खाली करण्याच्या प्रयत्नात अखेर त्यातून पाणी आलं. रेडकू आणि म्हैस हे पाणी पिऊन तृप्त झाले. आपल्या बाळासाठी म्हशीनं हॅण्डपंपचा वापर करून पाणी काढलं आणि प्यायला दिलं. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. हे वाचा-पाण्यात सापाची शेपटी खेचायला गेला तरुण, मागून आला अजगर आणि... 4 लाखहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. अक्कल मोठी की म्हैस असाही प्रश्न अनेक युझर्सनी विचारला आहे. माणसाची अक्कल तर हा व्हिडीओ तयार करण्यापूरती असल्याचं एका युझरनं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. तर दुसरा युझर म्हणतो माणसाची अक्कल जेव्हा चरायला जाते तेव्हा म्हैस मोठी असते. अशा अनेक कमेंट्स या व्हिडीओवर आल्या आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तहानलेला म्हैस कुणाचीही मदत न घेता स्वत: प्रयत्न करून तो हॅण्डपंप हलवून त्यातून पाणी काढते आणि ते आपल्या रेडकूसाठी देते आणि मन स्वत: पिते. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आत्मनिर्भर म्हैस म्हणून हा व्हिडीओ व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Viral video.

    पुढील बातम्या