JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / दिवाळीपूर्वी तुमचे जुने दागिने दिसतील नव्यासारखे, स्वच्छ करण्याच्या या सोप्या टिप्स पहा

दिवाळीपूर्वी तुमचे जुने दागिने दिसतील नव्यासारखे, स्वच्छ करण्याच्या या सोप्या टिप्स पहा

सोन्या-चांदीच्या दागिन्यांना नवीन चमक आणणे हे एक आव्हानात्मक काम आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला दागिने साफ करण्याच्या काही सोप्या टिप्स सांगणार आहोत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 ऑक्टोबर : सणासुदीच्या काळात स्मार्ट लुक दिसण्यासाठी बहुतेक लोक सोन्या-चांदीचे दागिने घालतात. दिवाळीत घराची साफसफाई करताना अनेकजण दागिनेही साफ करतात. मात्र, जुने दागिने साफ करणे इतके सोपे काम नसते. तुम्हाला हवे असल्यास काही टिप्सच्या मदतीने नवीन-जुने सोन्या-चांदीचे दागिने काही मिनिटांत चमकदार बनवता येतात. सोन्या-चांदीच्या दागिन्यांना नवीन चमक आणणे हे एक आव्हानात्मक काम आहे. त्याचबरोबर दागिने पॉलिश करण्यासाठीही जास्त वेळ लागतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला दागिने साफ करण्याच्या काही सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्याचे पालन करून तुम्ही सर्व सोन्या-चांदीचे दागिने घरच्या-घरी नव्यासारखे बनवू शकता. डिशवॉश पावडरने स्वच्छ करा - डिशवॉश पावडरच्या मदतीने तुम्ही दागिन्यांमध्ये साचलेली घाण सहज साफ करू शकता. यासाठी कोमट पाण्यात डिशवॉश पावडर मिसळा. या मिश्रणात सोन्या-चांदीचे दागिने घालून तसेच ठेवून द्या. काही वेळाने टूथब्रशने हलकेच घासल्यास दागिने लगेच चमकतील. टूथपेस्ट वापरा - चांदीचे दागिने स्वच्छ करण्यासाठी टूथपेस्टचा उत्तम वापर केला जातो. यासाठी चांदीच्या दागिन्यांवर टूथपेस्ट लावा आणि 10 मिनिटे राहू द्या. आता टूथब्रशच्या साहाय्याने दागिने हलके चोळून कोमट पाण्याने दागिने धुवा. यामुळे तुमचे चांदीचे दागिने एकदम नवीन दिसतील.

अमोनियाची मदत घ्या - तुम्ही अमोनिया वापरून सोन्या-चांदीचे दागिने देखील स्वच्छ करू शकता. यासाठी कोमट पाण्यात अमोनिया पावडर मिसळून दागिने त्यात ठेवा. आता दोन मिनिटांनी ब्रशने घासल्याने दागिने लगेच साफ होतील. पण लक्षात ठेवा की, मोती किंवा इतर रत्नांसाठी अमोनिया अजिबात वापरू नका. हे वाचा -  दिवाळीत लक्ष्मीपूजन करताना या गोष्टी ध्यानात ठेवा, धन-धान्य कधी कमी नाही पडत दागिने मिठाने चमकतील - सोन्या-चांदीचे दागिने स्वच्छ करण्यासाठी तुम्ही मिठाचीही मदत घेऊ शकता. यासाठी कोमट पाण्यात मीठ मिसळून दागिने त्यात ठेवा. यानंतर दागिने ब्रशने हलके चोळून स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे तुमच्या दागिन्यांतील घाण सहज निघून जाईल. सिल्व्हर पॉलिश वापरा - चांदीच्या दागिन्यांची चमक परत आणण्यासाठी तुम्ही सिल्व्हर पॉलिश देखील वापरून पाहू शकता. यासाठी चांदीच्या दागिन्यांना सिल्व्हर पॉलिश लावून घासून घ्या. नंतर दागिने कोमट पाण्याने धुवा आणि सुती कापडाने पुसून काढा. यामुळे तुमचे दागिने नव्यासारखे चमकतील. (सूचना: या लेखात दिलेली माहिती आणि माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या