JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / पावसाळा सुरू होताच 'या' आजाराचं संकट; बचावासाठी तात्काळ करा अशा उपाययोजना

पावसाळा सुरू होताच 'या' आजाराचं संकट; बचावासाठी तात्काळ करा अशा उपाययोजना

स्वतःच्या तसेच तुमच्या कुटुंबातील इतरांच्या सुरक्षिततेसाठी पूर्वीच काही उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे डेंग्यूसारख्या आजाराचा (Dengue In Monsoon) धोका लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 जून : अनेक राज्यांमध्ये हळूहळू मान्सूनचे (Monsoon Season) आगमन होत आहे. या ऋतूमध्ये डेंग्यू (Dengue), मलेरिया (Malaria) यांसारखे सर्वाधिक डासांमुळे पसरणारे आजार होण्याचा धोका वाढतो. इतकेच नाही तर हवेत अनेक प्रकारचे बॅक्टेरिया आणि व्हायरस पसरतात. ज्यामुळे इतर अनेक आजारांचा (Mosquito Transmitted Diseases) धोकाही वाढतो. पावसाळ्यात डासांची उत्पत्ती होत असल्याने बहुतांश लोकांना डेंग्यूची लागण होते. सीडीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, डेंग्यू हा पावसामुळे (Dengue In Monsoon) होणारा आजार आहे, जो एडिस डासामुळे पसरतो. डेंग्यूमध्ये व्यक्ती आरोग्य अत्यंत गंभीर होऊ शकते. त्यामुळे ही परिस्थिती टाळण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. स्वतःच्या तसेच तुमच्या कुटुंबातील इतरांच्या सुरक्षिततेसाठी पूर्वीच काही उपाययोजना (Precautionary Measures For Dengue) करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे डेंग्यूसारख्या आजाराचा धोका लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही प्रतिबंधात्मक उपायांबद्दल माहिती देणार आहोत. जे डेंग्यूपासून वाचवण्यास मदत करतील डेंग्यू टाळण्यासाठी करा उपाययोजना - रात्री झोपताना डासांपासून दूर राहण्यासाठी जाळी किंवा मच्छरदाणीचा वापर (Use Mosquito Net) करावा, जेणेकरून डास तुमच्यापर्यंत येऊ शकणार नाहीत. - सूर्य मावळल्यानंतर लगेच घराच्या खिडक्या आणि दरवाजे बंद करावेत. जेणेकरून डास घरात प्रवेश करणार नाहीत. - बागेत जाताना शरीर पूर्णपणे झाकून घ्यावे.

पावसाळ्यात आजारी पडताच घेता अँटिबायोटिक्स, वेळीच व्हा सावध! ही सवय ठरू शकते घातक

- आजूबाजूचे वातावरण स्वच्छ ठेवणे (Keep House Clean) अत्यंत आवश्यक आहे. घरामध्ये रोज झाडून पुसून घ्या. जेणेकरून पाणी कुठेही साचणार नाही आणि घाणीमुळे डास एका ठिकाणी जमणार नाहीत. - रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणारे पदार्थ खा. जेणेकरून संसर्ग झाला तरी तुम्ही त्यातून सहज बरे होऊ शकता. - पावसाळ्यात बाहेरील वस्तू आणि तळलेल्या पदार्थांचे (Avoid Outside Food) सेवन करणे बंद करा. - सकाळी आणि संध्याकाळी मॉस्किटो रिपेलंट्स वापरा. त्याचबरोबर हात आणि पायांवर मच्छर प्रतिबंधक मलम वापरा. - जर तुम्ही घरी क्वारंटाईन झालेले असाल तर सामाजिक अंतर ठेवा.

Health Tips: डायबेटीज असलेले हंगामी फळं खाऊ शकतात का? आरोग्य तज्ज्ञांनी सांगितली माहिती

संबंधित बातम्या

- तुमचे घर स्वच्छ ठेवा आणि पुसताना तुम्ही फिनाईल किंवा कोणतेही जंतुनाशक वापरू शकता. जेणेकरुन घरात डास आणि माश्या वावरणार नाहीत आणि अशा आजारांचा धोका (Prevent Dengue) देखील खूप कमी होऊ शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या