Home /News /lifestyle /

पावसाळ्यात आजारी पडताच घेता अँटिबायोटिक्स, वेळीच व्हा सावध! ही सवय ठरू शकते घातक

पावसाळ्यात आजारी पडताच घेता अँटिबायोटिक्स, वेळीच व्हा सावध! ही सवय ठरू शकते घातक

पावसाळ्यात तर सर्दी खोकला (Monsoon Health Problems) हे खूप सामान्य होणारे आजार आहेत. या दिवसांमध्ये या आजारांसोबतच आपले अँटिबायोटिक्स घेण्याचे प्रमाणही (Antibiotics Over Dose) वाढते. मात्र असे केल्याने अनेक दुष्परिणाम देखील होऊ शकतात.

पुढे वाचा ...
  मुंबई, 23 जून : हल्ली आपल्याला कोणताही शारीरिक त्रास जास्त वेळ सहन करण्याची सवय नाही. किंबहुना आता आपल्याकडे इतके सहज पर्याय उपलब्ध असतात की आपल्याला कोणत्याही शारीरिक त्रासापासून त्वरित सुटका मिळू शकते. याचे सरावात मोठे उदाहरण म्हणजे अँटिबायोटिक्स (Antibiotics) किंवा पेनकिलरचे (Painkiller) सेवन. हल्ली थोडासाही त्रास झाला कि आपण लगेच अँटिबायोटिक्स घेतो. पावसाळ्यात तर सर्दी खोकला (Monsoon Health Problems) हे खूप सामान्य होणारे आजार आहेत. या दिवसांमध्ये या आजारांसोबतच आपले अँटिबायोटिक्स घेण्याचे प्रमाणही (Antibiotics Over Dose) वाढते. मात्र असे केल्याने अनेक दुष्परिणाम देखील होऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला अँटिबायोटिक्सचा जास्त प्रमाणात वापर केल्यास काय दुष्परिणाम (Antibiotics Side Effects) होतात याबद्दल माहिती देणार आहोत. हेल्थ लाइननुसार, असे केल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आणि आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दिसू शकतात. विशेषत: लहान मुलांना जास्त अँटिबायोटिक्स देणे टाळा. मुलांची रोगप्रतिकारक शक्ती (Weak Immunity) आधीच कमकुवत असते आणि इतके अँटिबायोटिक्स सहन करण्याची त्यांची क्षमता नसते. प्रत्येक छोट्या मोठ्या त्रासावर अँटिबायोटिक्स घेतल्याने त्यामुळे नुकसानच जास्त होते. अँटिबायोटिक्स अधिक प्रमाणात वापरण्याचे दुष्परिणाम - पावसाळ्यात लहान मुलांना सर्दी होण्याचे प्रमाण वाढते. यावर उपाय म्हणून मुलांना वारंवार अँटिबायोटिक्सची औषधं दिली जात असतील. तर मुलांमध्ये अतिसाराचा (Diarrhea) धोका लक्षणीयरीत्या वाढतो आणि त्यांना अधिक तीव्र जुलाब देखील होऊ शकतो. - पोटात चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रकारच्या बॅक्टेरियाचा समतोल राखणे गरजेचे आहे. अँटीबायोटिक्स जास्त प्रमाणात घेतल्यास ते पोटातील चांगले बॅक्टेरिया नष्ट करू लागतात. यामुळे पचनाशी संबंधित समस्या वाढू शकतात.

  फक्त वाईट सवय समजू नका; माती, खडू असं नको ते खाणं म्हणजे आहे एक आजार

  - जर अँटीबायोटिक्स वापरून अ‍ॅलर्जीक प्रतिक्रिया दिसून येत असतील तर त्या मोठ्या प्रमाणात न घेता अल्प प्रमाणात घ्याव्यात (Antibiotics Limited Dose) आणि डॉक्टरांना त्याऐवजी एखादा पर्याय विचारावा. - शरीरात चांगल्या बॅक्टेरियाच्या कमतरतेमुळे, बुरशीजन्य संसर्गासारख्या (Fungal Infections) आजरांचा धोका देखील लक्षणीय वाढू शकतो. यीस्ट संसर्ग (Yeast Infection) देखील दिसू शकतो.

  ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवेल या झाडाची साल; खाण्याची पद्धतही समजून घ्या

  - पचनक्रिया मंदावणे, उलट्या, मळमळ, पोट फुगणे, भूक न लागणे किंवा पोटात जास्त दुखणे यांसारखी पचनाशी संबंधित लक्षणे दिसू शकतात. - या सर्व समस्या टाळण्याचा एकमेव उपाय म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याने अँटिबायोटिक्स घेणे. स्वतः कोणतेही अँटिबायोटिक घेऊ नका.

  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Health Tips, Lifestyle, Side effects

  पुढील बातम्या