मुंबई, 17 मार्च : कोरोनाव्हायरसने (Coronavirus) जगभरात लाखो लोकांना आपल्या विळख्यात घेतलं आहे. कोरोनाव्हायरसचा अधिक प्रसार होऊ नये, यासाठी शाळा, कॉलेज, जिम, स्विमिंग पूल अशी गर्दीची ठिकाणं बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला. जिम बंद असल्याने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस घरात योगा करताना दिसली, तर आणि कतरिना कैफनेही घरच्या घरीच वर्कआऊट केला, हे तर तुम्ही पाहिलंच. मात्र फक्त या अभिनेत्रीच नव्हे, तर इतर सामान्य व्यक्तींनीही कोरोनामुळे आपल्या वर्कआऊटवर परिणाम होऊ दिलेला नाही. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला आश्चर्यच वाटेल. कारण संपूर्ण अपार्टमेंटच वर्कआऊट करताना दिसतं आहे, तेदेखील घराच्या बाल्कनीत. कोरोनाव्हायरसच्या भीतीनं या अपार्टमेंटमधील लोकांनी स्वत:ला घरात बंदिस्त करून घेतलं आहे. मात्र घराच्या बाल्कनीत येऊन हे लोकं वर्कआऊट करत आहेत.
या व्हिडीओमध्ये जिम ट्रेनर छतावर चढला आहे आणि बाल्कनीत आलेल्या लोकांकडून वर्कआऊट करून घेत आहे. हा व्हिडीओ स्पेनचा असल्याचं सांगितलं जातं आहे.या व्हिडीओवर प्रतिक्रिया देणाऱ्या एका युजर्सने म्हटलं की, कोणत्याही परिस्थितीत फिटनेस राखणं सोडू नका, हेच या व्हिडीओतून शिकायला मिळतं आहे. जेव्हा आपण फिट राहू तेव्हाच आजारांशी लढण्याची ताकद आपल्याल मिळेल. हे वाचा - FACT CHECK - उकाडा वाढल्यानंतर महाभयंकर कोरोनाव्हायरसचा नाश होणार?