मुंबई, 09 एप्रिल : आपल्याला कोरोनाव्हायरस (coronavirus) होऊ नये म्हणून अनेक जण घराबाहेर पडत नाहीत. जे काही हवं ते घरच्या घरीच मागवलं जातं आहे. आवश्यक सामान असो किंवा खाण्याचे पदार्थ, त्याची होम डिलीव्हरी (home delivery) घेतानाही योग्य काळजी घेतली नाही तर कोरोनाव्हायरसचा धोका आहे. कोरोनाव्हायरस वेगवेगळ्या पृष्ठभागावर (surface) काही वेळ जिवंत राहू शकतो. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीन आणि द लँसेट मायक्रोबने केलेल्या अभ्यासानुसार, -पेपर आणि टिश्यूवर - 3 तास -कार्डबोर्ड - 24 तास -प्लास्टिक - 3 दिवस इतका वेळ जिवंत राहू शकतो. पार्सलसाठी सहसा याच वस्तूंचा वापर केला जातो. त्यामुळे खबरदारी घेण्याची गरज आहे. होम डिलीव्हरी घेताना डिलीव्हरी देणा-या व्यक्तीच्या संपर्कात येऊ नका. पार्सल एका सुरक्षित जागेवर ठेवायला सांगा. पार्सल घेण्यापूर्वी ग्लोव्ह्ज घाला. एखाद्या ठिकाणावर पार्सल ठेवण्यापूर्वी आणि त्यानंतरही ती जागा sanitize करून घ्या.पार्सल आणि त्याच्या आतील सामान नीट sanitize करून घ्या. खाण्याचे पदार्थ किंवा जेवण असेल तर त्याच पाकिटात खाऊ नका. एका स्वच्छ भांड्यात काढून घ्या आणि गरम करून घ्या. पाकीट फेकून द्या. त्यानंतर हात साबण आणि पाण्याने किमान 20 सेकंद धुवा. चेह-याला हात लावू नका. महिलांपेक्षा पुरुष coronavirus चे सर्वाधिक शिकार, डॉक्टरांनी दिली ‘ही’ कारणं हँडसम दिसण्यासाठी दाढी वाढवताय, CoronaVirus ला निमंत्रण देताय संकलन, संपादन - प्रिया लाड