मुंबई, 12 मे : अंतराळामध्ये काही अद्भुत आणि अचंबित करणाऱ्या घटना घडत असतात. 13 मे रोजी देखील जमिनीवरून आसमंतातील आतषबाजी पाहायला मिळणार आहे. चमकणारा धुमकेतू अगदी पृथ्वीच्या जवळून जाणार आहे. विशेष म्हणजे कोणत्याही दुर्बिणीशिवाय उघड्या डोळ्यांनी तुम्ही ते पाहू शकता. मे महिन्यामध्ये 2 वेळा हे दृश्य पाहाता येणार आहे. 13 मेला पृथ्वीच्या 8.33 कोटी किलोमीटर इतक्या लांबून जाणाऱ्या धुमकेतूचं नाव कॉमेट स्वान (Comet SWAN) आहे. खूप वेगाने तो पृथ्वीच्या जवळ येत आहे. तर यानंतर कॉमेट अॅटलस (Comet ATLAS) 23 मे रोजी पृथ्वीजवळून जाणार आहे.
13 मे रोजी दिसणाऱ्या या धुमकेतू स्वानचा शोध 11 एप्रिल रोजी लागला होता. मायकल मॅटिय्याजो या अस्ट्रॉनॉटने हा शोध लावला होता. या धुमकेतूचे एक ट्विटर हँडल देखील बनवण्यात आले आहे.
विषुववृत्ताच्या दक्षिणेस राहणाऱ्यांना या धुमकेतूचे दर्शन होणार आहे. भारत विषुववृत्ताच्या उत्तरेस असल्यामुळे भारतीयांना या निसर्गाच्या किमयेचं दर्शन उघड्या डोळ्यांनी होणार नाही. दुर्बिणीतून हा धुमकेतू तुम्ही पाहू शकाल. हा धुमकेतू पायसेज कॉन्स्टिलेशन (मीन नक्षत्र)कडून प्रचंड वेगाने येत आहे. हिरव्या रंगामध्ये खूप वेगाने येताना त्याचे दर्शन होईल. (हे वाचा- दिलासा की चिंता? कोरोनाच्या दहशतीत ‘या’ आजाराचे रुग्ण कमी झाले ) त्याचप्रमाणे 23 मे रोजी पृथ्वीजवळून एक धुमकेतू जाणार आहे त्याचे नाव कॉमेट अॅटलस आहे. Comet C/2019 Y4 ATLAS हा धुमकेतू अद्याप किती दूर आहे याचा अंदाज लावता आलेला नाही. याचा शोध 28 डिसेंबर 2019 मध्ये लावण्यात आला होता. त्याचे देखील एक ट्विटर हँडल बनवण्यात आले आहे.
पृथ्वीजवळून हा धुमकेतू कधी जाणार आहे, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. याबाबत वैज्ञानिकांचा शोध सुरू आहे. भारतातून हा धुमकेतू उघड्या डोळ्यांनी पाहता येईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.