मुंबई, 08 ऑक्टोबर : सफरचंदाच्या फायद्यांबद्दल तुम्ही ऐकलेच असेल आणि त्याच्याशी संबंधित एक म्हणही ऐकली असेल की रोज सफरचंद खाल्ल्यास डॉक्टरकडे जाण्याचा धोका कमी होतो. बहुतेक घरांमध्ये लोक सकाळची सुरुवात चहा किंवा कॉफीने करतात. यामुळे त्यांना एक ऊर्जा मिळते आणि लोक दिवसभरातील आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार होतात. मात्र बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की, सकाळची सुरुवात कशाने करावी कॉफी की, फळांनी? सकाळी तुमच्यासाठी आरोग्यदायी काय आहे? सकाळी कॉफी प्यावी की सफरचंद खावे? आज आम्ही तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत.
कॉफी Cornel.education नुसार, जर तुम्ही सकाळी कॉफीचे सेवन केले, तर तुमची रक्तदाब पातळी, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड पातळी, तापमान, मेंदूची क्रिया सामान्य होते. जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा तुमच्या शरीराचे तापमान आणि बीपी पातळी कमी होते.
दररोज सकाळी चहाबरोबर ब्रेड खाताय? आताच थांबवा, कारण…दररोज सकाळी 100 मिलीग्राम कॉफी प्यायल्याने तुमचे हृदय आणि श्वासोच्छवासाचा वेगही वाढतो. यामुळे तुमची मज्जासंस्थाही व्यवस्थित काम करू लागते. सफरचंद सफरचंद खाल्ल्याने श्वासोच्छवास चांगला होतो. सफरचंदामध्ये फोटो न्यूट्रिएंट्स, व्हिटॅमिन्स, फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्ससारखे चांगले गुणधर्म आहेत. जे तुमच्या शरीराला आजारांपासून दूर ठेवतात. सफरचंदांमध्ये नैसर्गिक साखरदेखील आढळते, जी कॅफिन प्रमाणेच कार्य करते.
शुगर असणाऱ्यांनी खरंच भात खायचा नसतो का? डॉक्टर काय म्हणतात बघा..दोन्ही गोष्टी तुमच्या शरीरासाठी निरोगी आहेत. त्यामुळे तुम्ही सकाळी कोणत्याही एका गोष्टीचे सेवन त्याच्या फायद्यांनुसार करू शकता.