दुसरी लाट म्हणजे त्सुनामी ठरेल मला काहीशी नाराजी व्यक्त करायची आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आपण कोरोना रुग्णांचे आकडे खाली आणले पण दिवाळी आणि नंतर अधिक काळजी घेणे गरजेचे आहे तसे होताना दिसत नाही. कोरोनाचे संकट नाहीसे झालेले नाही तर पाश्चिमात्य देशात बऱ्याच ठिकाणी लॉकडाऊन लावले गेले आहे. दिल्लीत दुसरी तिसरी लाट आली आहे. गुजरातमध्ये रात्रीची संचारबंदी लावली आहे. ही नुसती लाट नाही तर त्सुनामी आहे कीकाय असे वाटतेय. आपल्याकडे वैद्यकीय यंत्रणा तयार आहे पण त्यावर किती ताण टाकायचा याला काही मर्यादा आहेत. कृपा करून सगळं उघडे केले म्हणजे कोरोना गेला आहे असा अर्थ होत नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले.
नवी दिल्ली, 04 नोव्हेंबर : भारतात कोरोनाव्हायरसच्या (coronavirus) एकूण रुग्णांमध्ये 17 वर्षांपेक्षा कमी वयाचे फक्त 9 टक्के रुग्ण आहेत. कोरोनाव्हायरसचा धोका लहान मुलांना कमी असल्याचा सांगितला जातो आहे. लहान मुलांमध्ये कोरोनाचं संक्रमण कमी असलं तरी त्यांच्यामुळे कोरोना पसरत आहे. ते कोरोनाचे स्प्रेडर्स असू शकतात, असं आयसीएमआरनं म्हटलं आहे. मिझोराममधील कोरोनाग्रस्त मुलांची संख्या वाढली आहे. त्याबाबत प्रश्न विचारला असता आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी लहान मुलांमधील कोरोना संक्रमणाबाबत माहिती दिली. मिझोराममधील आकडेवारी पाहता लहान मुलांमधील कोरोना संक्रमणाचं प्रमाण एक टक्क्यापेक्षाही कमी आहे. काही देशांमध्ये लहान मुलांंमध्ये कावासाकी आजारासारखी लक्षणं दिसत आहेत. हा कोरोनासंबंधी आजार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्या कोरोनाग्रस्त मुलांमध्ये कोरोनाची लक्षणं नाहीत, त्यांच्यामध्ये अशी लक्षणं दिसून येत असल्याचं संशोधकांनी सांगितलं. जगभरातील विविध भागामध्ये याचा संबंध कोरोनाशी लावण्यात आला आहे. दरम्यान याबाबतही भार्गव यांनी सविस्तर माहिती दिली आहे. हे वाचा - बदलत्या CORONA लाही घाबरण्याची गरज नाही; प्रत्येक स्ट्रेनवर प्रभावी अशी लस तयार कावासाकी हा ऑटो-इम्युन आजार आहे आणि यामध्ये ताप येणं, थ्रोम्बोसाइटोसिस आणि हृदयाच्या रक्तवाहिन्या प्रभावित होऊ शकतात. यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना याचा धोका अधिक असतो. ही दुर्मिळ असा आजार आहे, ज्याचा फटका महिलांपेक्षा पुरुषांना अधिक बसतो. हे वाचा - आपली रोगप्रतिकारक शक्ती कोरोनापासून आपला किती बचाव करू शकते? अमेरिकेमध्ये हा आजार सर्वसाधारण असून भारतात याचा अद्याप संबंध आढळून आलेला नसल्याचंदेखील भार्गव यांनी सांगितलं. कोरोना रुग्णांमध्ये कावासाकी आजाराची कोणतीही लक्षणं दिसली नाहीत. तसंच कोरोना आणि कावासाकीचा काहीही संबंध नाही असं त्यांनी स्पष्ट केलं.