इस्लामाबाद, 28 जानेवारी : लहान मुलांना (child) सायकल किंवा खेळण्यातील इलेक्ट्रिक कार चालवताना तुम्ही पाहिलं असेल. खऱ्या कारमध्येही लहान मुलं (kids) ड्रायव्हरच्या सीटवर बसतात आणि कार चालवण्याचं खोटंखोटं नाटकही करतात. लहान मूल म्हटल्यावर त्यांना या सर्व गोष्टींचं आकर्षण असतंच. पण त्यांची ही हौस या वयात प्रत्यक्ष करू देणं शक्यच नाही. पालक त्यांना तसं करूही देत नाहीत. पण तुम्हाला विश्वास बसणार नाही एका चिमुरड्यानं चक्क लँड क्रुझरसारखी Landcruiser भलीमोठी कार रस्त्यावर (child driving Landcruiser) वाऱ्यासारखी पळवली आहे. चिमुरडा कार चालवतानाचा व्हिडीओ (video) सोशल मीडियावर (social media) व्हायरल (viral) झाला आहे. लँड क्रुझर कार आणि तीदेखील एका चिमुरड्यानं चालवली हे वाचूनच हैराण झालात ना? इतक्या कमी वयाचा मुलगा इतकी मोठी कार चालवूच शकत नाही, असंच तुम्ही म्हणाल. मग आता हा व्हिडीओ पाहा. ट्विटरवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये तुम्ही आता जे काही वाचलं ते प्रत्यक्षात पाहू शकता.
व्हिडीओत पाहू शकता एक लहान मुलगा ब्लॅक कलरची लँड क्रुझर अगदी मजेत चालवतो आहे. हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या ट्विटर युझरनं व्हिडीओ पाकिस्तानच्या मुल्तान शहरातील असल्याचं सांगितलं आहे. या शहरात गर्दी असलेल्या रस्त्यावर तो इतकी मोठी गाडी अगदी सहजपणे चालवतो आहे. हे वाचा - ‘मै टकलू हो जाऊंगा’ चिमुकल्याचा केस कापतानाचा क्यूट व्हिडीओ पुन्हा VIRAL एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार या चिमुरड्याचं वय अवघं पाच वर्षे असल्याचं सांगितलं आहे. इतक्या वयाच्या मुलाचे गाडीच्या पेडलपर्यंत पाय पोहोचणंही शक्य नाही. त्यामुळे तो ड्रायव्हिंग करताना सीटवर बसलेला नाही तर गाडीत उभा राहिला असल्याचंही दिसतं आहे. खरंच हा चिमुरडा स्वत: कार चालवतो आहे की आणखी कुणी आहे. हा व्हिडीओ कितपत खरा आहे माहिती नाही. पण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आपला आपल्या डोळ्यांवरही विश्वास बसत नाही आहे.