मुंबई, 20 फेब्रुवारी : अनेकदा किरकोळ अपघातांमुळे आपल्या हाडांना इजा होते. हाडे तुटतात. गोळ्या औषधींनी ते बऱ्यापैकी ठीकही होते. मात्र जसजसा वेळ जातो तास त्याचा त्रास पुन्हा सुरु होतो. मोडलेले हाड तुम्हाला खूप दिवस वेदना देऊ शकते. ऋतूबदलामुळेही अनेकदा याचा त्रास वाढतो. अशावेळी थेट औषधी घेण्यापेक्षा थोड्याश्या त्रासावर काही घरगुती उपायांची मदत होऊ शकते. जाणून घेऊया कोणते आहेत ते घरगुती उपाय. निलगिरी तेल : निलगिरीच्या तेलामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत, जे वेदना कमी करण्यासाठी प्रभावी आहेत. निलगिरी तेलामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे जळजळ कमी होते. या तेलाने मसाज केल्याने हाड तुटल्याचा त्रास दूर होतो.
Pregnancy Tips : प्रेग्नेंसिचं प्लानिंग करण्यापूर्वी महिलांनी ‘या’ सवयी सोडा, नाहीतर बाळावर होईल परिणामऑलिव्ह ऑईल : ऑलिव्ह ऑईल हाडांसाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्ससारखे अनेक फायदेशीर घटक असतात जे हाडे मजबूत करतात. ऑलिव्ह ऑईलने मसाज केल्यास स्नायूंची सूज कमी होते, शरीराला आराम मिळतो आणि वेदनाही दूर होतात. मसाजसाठी हे तेल थोडे गरम करून वापरावे. याचा अधिक फायदा होतो.
पेपरमिंट ऑइल : पेपरमिंट ऑइल हाडांच्या वेदना कमी करण्यासाठी अनेकवेळा वापरले जाते. पेपरमिंट तेलाने मसाज केल्याने स्नायूंमध्ये रक्ताभिसरण सुधारते. यामुळे वेदना आणि सूज कमी होते. पुदिना बारीक करून दुखणाऱ्या जागेवर लावल्यानेदेखील आराम मिळतो.
तिळाचे तेल : झी न्युजने दिलेल्या माहितीप्रमाणे, फ्रॅक्चर झालेल्या जागेवर तिळाच्या तेलाने मालिश केल्याने वेदना आणि सूज दूर होते. तिळाचे तेल गरम केल्यानंतर फ्रॅक्चर झालेल्या भागावर मसाज करावी.
World Samosa Day 2022 : मांसाहारी समोसा भारतात येऊन शाकाहारी कसा झाला?(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)