जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / Pregnancy Tips : प्रेग्नेंसिचं प्लानिंग करण्यापूर्वी महिलांनी 'या' सवयी सोडा, नाहीतर बाळावर होईल परिणाम

Pregnancy Tips : प्रेग्नेंसिचं प्लानिंग करण्यापूर्वी महिलांनी 'या' सवयी सोडा, नाहीतर बाळावर होईल परिणाम

Pregnancy Tips  : प्रेग्नेंसिचं प्लानिंग करण्यापूर्वी महिलांनी 'या' सवयी सोडा, नाहीतर बाळावर होईल परिणाम

तुम्हाला माहितीय का की जन्मानंतरच नाही तर बाळाच्या जन्मापूर्वीपासून स्त्रीयांनी याची काळजी घ्यावी. ज्यामुळे बाळ निरोगी आणि हेल्दी होतं.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : लग्नानंतर प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात एक महत्वाचा टप्पा येतो, तो म्हणजे मातृत्व. आई जेव्हा बाळाला जन्म देते, तेव्हा खरंतर बाईचा एक नवीन जन्म होतो असं म्हणतात. बाळाच्या जन्मानंतर स्त्री आपल्या बाळाचं चांगलं संगोपन करुन, त्याला चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न करते. एवढंच काय तर आई आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी चांगलं चुंगलं खायला देखील देते. परंतू तुम्हाला माहितीय का की जन्मानंतरच नाही तर बाळाच्या जन्मापूर्वीपासून स्त्रीयांनी याची काळजी घ्यावी. ज्यामुळे निरोगी आणि हेल्दी बाळ जन्माला येतं.

News18

खरंतर महिलांनी प्रेग्नेंट होण्यापूर्वीच काही गोष्टींचं नियोजन करावं. ज्याचा त्यांच्या बाळाला आणि स्वत: आईला खूप मोठा फायदा होतो. हे लक्षात घ्या की बाई जर स्वतःला आतून निरोगी असेल, तेव्हाच ती निरोगी बाळाला जन्म देऊ शकता. अनेक वेळा रोजच्या काही वाईट सवयींमुळे महिलांना गरोदर राहण्यासाठी बऱ्याच अडचणी येतात. एवढंच नाही तर होणाऱ्या बाळाला देखील आजार उद्भवतात. अशा परिस्थितीत, गर्भधारणा होण्यासाठी प्रत्येक महिलांनी त्यांच्या या वाईट सवयी टाळल्या पाहिजेत. आता त्या सवयी कोणत्या? चला समजून घेऊ. तणाव टाळा सर्वात महत्वाचं म्हणजे या काळात महिलेनं आनंदी राहावं. ताणतणाव अनेक आजारांना जन्म देऊ शकतो. त्यामुळे तणाव येऊ देऊ नका आणि याचा सामना करण्यासाठी स्वतःला चांगलं तयार करा. यासाठी योगासन करा. व्यायाम, ध्यान करा ज्यामुळे तुमचा ताण कमी होईल. बाहेरचं खाणं टाळा बाहेरचं खाणं खूपच अनहेल्दी असतं, ज्यामुळे कधीकधी गर्भधारणेची शक्यता कमी होते. यामुळे तुम्हाला शरीरातून चांगलं वाटत नाही ज्यामुळे चिडचिड होते. तसेच आईची यामुळे महिला आजारी देखील पडते. अशावेळे फळे आणि भाज्यांसारखे निरोगी पदार्थ खा. धूम्रपान टाळा पुरुषांचे शुक्राणू किंवा महिलांच्या अंड पेशींसाठी धूम्रपानाची सवय चांगली नाही. नियमितपणे धूम्रपान करणाऱ्या महिलांच्या गर्भाशयावर याचा परिणाम होतो. तसे पुरुषांच्याही धुम्रपान करणाचा परिणाम गर्भधारणेवर होतो. पुरुषांमध्ये शुक्राणूंची गती 13% कमी असते, जी शुक्राणूंना अंड्यापर्यंत पोहोचू देत नाही. ज्यामुळे गर्भधारना कठीण होते. दारू पिणं टाळा जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने शुक्राणूंची गतिशीलता कमी होते, ज्यामुळे गर्भधारणेची शक्यता कमी होते. गर्भधारणेचा प्रयत्न करताना महिलांनी दारू पिणे टाळले नाही, तर यामुळे गर्भातील मुलाला अल्कोहोल सिंड्रोम देखील होऊ शकतो. प्रोसेस केलेले पदार्थ खाणे टाळा फ्रेंच फ्राय, फ्राईड ओनियन रिंग्ज, चिकन नगेट्स इत्यादी गोष्टी खायला खूप चविष्ट असतात, पण या सगळ्या गोष्टी तुमच्या गर्भधारणेच्या मार्गात अडथळे निर्माण करू शकतात. प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ किंवा प्रक्रिया केलेले मांस, मासे देखील खाणं टाळा. यामध्ये रेडी टू इट फूड यांचाही समावेश आहे. संसर्गापासून स्वतःचे संरक्षण करा ज्या स्त्रिया गरोदर राहण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांनी न शिजवलेले दुग्धजन्य पदार्थ, कच्चे मांस, मऊ चीज, सुशी, उच्च-पारा असलेले मासे, इत्यादी जोखमीचे पदार्थ खाणे टाळावे. हे सर्व पदार्थ गर्भाच्या संसर्गावर परिणाम करू शकतात. ज्यामुळे जन्मत: कमी वजन, अकाली प्रसूती आणि काही प्रकरणांमध्ये भविष्यात गर्भपात यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात