JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / लक्षणं दिसण्याआधीच Cancer चं निदान करणार फक्त एक ब्लड टेस्ट, शास्त्रज्ञांचा दावा

लक्षणं दिसण्याआधीच Cancer चं निदान करणार फक्त एक ब्लड टेस्ट, शास्त्रज्ञांचा दावा

एक ब्लड टेस्ट (Blood test) कॅन्सरची (cancer) लक्षणं दिसण्यापूर्वीच त्याचं निदान करू शकतं, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

जाहिरात

कर्करोगामुळे भारतात वर्षभरात हजारो लोकांचे मृत्यू होत आहेत. कर्करोगामुळे मृत्यू होण्याचं मूळ कारण म्हणजे हा रोग झाल्याचं फार उशीरा कळतं. त्यामुळे त्यावर उपचारही उशीराने सुरू होतात. जर हा आजार वेळीच कळला तर अनेक जीवांचे प्राण वाचू शकतात.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वॉशिंग्टन, 01 मे : कॅन्सरसारख्या (cancer) आजारामुळे लागोपाठ 2 दिवसांत आपण दोन बॉलीवूड कलाकारांना गमावलं. इरफान खान आणि ऋषी कपूर दोघंही कॅन्सरशी लढत होते. कॅन्सर हा आजार असा आहे, ज्याचं निदान लवकर होत नाही आणि जेव्हा निदान होतं, तोपर्यंत तो शरीरात पसरतो आणि उपचारात गुंतागुंत येतं, वाचण्याची शक्यता खूप कमी होते. मात्र आता अशी ब्लड टेस्ट (blood test) विकसित करण्यात आली आहे, जी कॅन्सरची लक्षणं दिसण्यापूर्वीच त्याचं निदान करू शकेल. सीएनएन च्या वृत्तानुसार या एका ब्लड टेस्टमुळे कित्येक प्रकारच्या कॅन्सरचं निदान होऊ शकतं. जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या (Johns Hopkins University) संशोधकांनी ही टेस्ट विकसित केली आहे. या टेस्टला लिक्विड बायोप्सी Liquid biopsy नाव देण्यात आलं आहे. हे वाचा -  Colon Infection : काय आहे हा आजार ज्याच्याशी लढत होते इरफान खान ज्या महिलांमध्ये कॅन्सरची कोणतीही लक्षणं नव्हती आणि त्यांना कॅन्सर आहे की नाही हे माहिती नाही अशा 10 हजार महिलांची प्रायोगिक तत्वावर ही ब्लड टेस्ट करण्यात आली. जेव्हा त्यांच्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्या तेव्हा पीईटी आणि सिटी स्कॅनमार्फत ट्युमर्सची चाचणी करण्यात आली. या 10 हजार महिलांमध्ये जवळपास 26 प्रकारचं कॅन्सरचं निदान झालं. कित्येक कॅन्सरचं निदान शरीरात पसरण्यापूर्वीच झालं. 6 महिलांना गर्भाशयाचा कॅन्सर होता, ज्याची शारीरिक लक्षणं दिसत नाहीत, जेव्हा हा कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरतो, तेव्हाच त्याचं निदान होतं आणि त्यावेळी रुग्णाची वाचण्याची शक्यता कमी असते. तर 9 महिलांना फुफ्फुस कॅन्सर असल्याचं निदान झालं, या कॅन्सरचीही लक्षणं लवकर दिसून येत नाही. कॅन्सरचं निदान झालेल्या या महिलांवर कॅन्सरच्या पहिल्याच टप्प्यात उपचार सुरू करण्यात आले, तर काही महिलांची सर्जरीही करण्यात आली. हे वाचा -  कोणत्या कॅन्सरशी झुंज देत होते ऋषी कपूर? निधनानंतर पहिल्यांदाच खुलासा रिसर्च टीममधील डॉ. बर्ट व्होगेलस्टेन यांनी सांगितलं, “ही टेस्ट करण्यापूर्वी त्यांना या महिलांना कॅन्सर असू शकतो हे माहितीच नव्हतं. सध्या फक्त या टेस्टचं ट्रायल झालं आहे. यावर अजून काम सुरू आहे” संकलन, संपादन - प्रिया लाड

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या