Colon Infection : काय आहे हा आजार ज्याच्याशी लढत होते इरफान खान

Colon Infection : काय आहे हा आजार ज्याच्याशी लढत होते इरफान खान

अभिनेते इरफान खान (Irrfan khan) यांना कोलन इन्फेक्शन (Colon Infection) होतं.

  • Share this:

मुंबई, 29 एप्रिल : अभिनेते इरफान खान (Irrfan khan) यांनी आज जगाचा निरोप घेतला आहे. इरफान खान यांना कोलन इन्फेक्शन (Colon Infection) होतं. त्यांना मुंबईतल्या कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान इरफान यांचा कोलन इन्फेक्शनमुळे मृत्यू झाला. इरफान यांना झालेला हा आजार नेमका आहे काय आणि त्याची लक्षणं काय आहेत, ते जाणून घेऊयात.

कोलन इन्फेक्शन म्हणजे काय?

हेल्थलाइनने दिलेल्या माहितीनुसार, कोलन म्हणजे मोठ्या आतड्यांना झालेलं इन्फेक्शन याला कोलाइटिस (colitis) असंही म्हणतात. हे इन्फेक्शन व्हायरस, बॅक्टेरिया किंवा पॅरासाइट्समुळे होऊ शकतं.

कोलोन इन्फेक्शन होण्याची कारणं

दूषित पाण्याचा पिणं, दूषित पदार्थ खाणं, स्वच्छतेची काळजी न घेणं ही कोलन इन्फेक्शन उद्भवण्याची सर्वसामान्य अशी कारणं आहेत.

कोलन इन्फेक्शनची लक्षणं

पोटात वेदना, ताप येणं, पोटात जंत होणं, डायरिया, मळमळ अशी सामान्य लक्षणं दिसतात. याशिवाय झपाट्यानं वजन कमी होणं, मोठ्या आतड्यांच्या पेशी मृत होणं ज्यामुळे अल्सर होतो, अशी गंभीर लक्षणंही हळूहळू दिसू लागतात.

कोलाइटिसचे प्रकार

इस्केमिक कोलाइटिस  - जेव्हा कोलनमध्ये रक्तप्रवाह नीट होत नाही, तेव्हा इस्केमिक कोलाइटिस होतो.

अॅलर्जिक कोलाइटिस  - मोठ्यांच्या तुलनेत लहान मुलांना हा आजार जास्त होतो. जवळपास 2 ते 3 टक्के मुलं यामुळे प्रभावित होतात.

माइक्रोस्कोपिक कोलाइटिस - शरीरात लिम्फोसाइटची पातळी वाढल्यानं माइक्रोस्कोपिक कोलाइटिस होतं. हे कोलाइटिस फक्त माइक्रोस्कोपमार्फतच दिसू शकतं.

औषधांमुळे होणारी कोलाइटिस - काही लोकं सूज कमी करणारी औषधं घेतात ज्यामुळे कोलनमध्ये सूज येते. ज्यांनी एनएसएआईडी औषधांचा वापर जास्त काळासाठी घेतली, त्यांना या कोलाइटिसचा धोका आहे.

संकलन, संपादन - प्रिया लाड

हे वाचा - कॅन्सरसमोरही हार मानली नव्हती मात्र आईच्या मृत्यूनंतर इरफान खान हरले आयुष्याशी झुंज

First published: April 29, 2020, 2:07 PM IST

ताज्या बातम्या