मुंबई, 21 एप्रिल : उन्हाळ्यात केसांची विशेष काळजी घ्यावी लागते. घाम, ऊन, उष्णता यामुळं केस कोरडे आणि निस्तेज बनतात आणि गळती वाढू शकते. एवढेच नाही तर योग्य पोषण न मिळाल्यानं केस पांढरे होऊ लागतात आणि त्यांची वाढही कमी होते. अशा परिस्थितीत केसांची योग्य काळजी घेण्यासाठी काळ्या तिळाच्या तेलाचा (Black sesame oil) वापर करणं खूप फायदेशीर आहे. काळ्या तिळांचे तेल वापरून केसांच्या अनेक समस्या कमी होतात. काळ्या तिळाच्या तेलात फॉस्फरस, प्रथिने, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियन आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळतात, हे घटक केसांच्या चांगल्या वाढीसाठी खूप महत्वाचे आहेत. जाणून घेऊया काळ्या तिळाचा वापर केसांच्या चांगल्या वाढीसाठी कसा करता येईल आणि त्याचे फायदे काय (Black sesame oil for hair care) आहेत. केसांसाठी काळ्या तिळाच्या तेलाचे फायदे केस राहतील काळे काळ्या तिळाचे तेल वापरल्यानं केस पांढरे होण्याची समस्या कमी होते. जर तुमचे केस अकाली पांढरे होत असतील तर आठवड्यातून 2 दिवस केसांमध्ये काळ्या तिळाचे तेल लावा. काळ्या तिळांची पानंदेखील पांढरे केस होण्याचा प्रॉब्लेम कमी करण्यासही फायदेशीर आहे. कोंडा कमी होतो केसांना काळ्या तिळाचे तेल लावल्याने कोंड्याचा त्रास कमी होतो. तसेच, यामुळे तुमचे केस मऊ आणि मजबूत होतात. आठवड्यातून तीनदा हे तेल वापरल्यास कोंड्याची समस्या कमी होऊ शकते. हे वाचा - त्वचेसाठी सूर्याची पहिली किरणं आहेत वरदान! फायदे कळल्यावर दररोज थांबाल उन्हात कोरडेपणा येत नाही केस दाट आणि मुलायम बनवण्यासाठी तिळाच्या फुलांपासून तयार केलेला हेअर मास्क वापरल्यास केस मऊ होतात. ते वापरण्यासाठी, 2 चमचे काळ्या तीळात 1 चिमूटभर केशर, मुलेटी आणि 2 ते 3 आवळे घालून मिक्सरमध्ये चांगले बारीक करा. आता या मिश्रणात 1 चमचा मध घाला. ही पेस्ट केसांना लावा आणि सुमारे 30 मिनिटांनंतर शॅम्पू करा. हे वाचा - सतत काळजी वाटत असेल तर असतो Anxiety चा त्रास; आहारात असा बदल करून रिलॅक्स व्हा मजबूत केस केसांची मुळे मजबूत करण्यासाठी तिळाचे तेल थोडे गरम करून केसांना मसाज करा. कोमट तिळाच्या तेलाने मसाज केल्याने केसांची मुळे आतून मजबूत होतात आणि केस दाट होतात. (सूचना : य़ेथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)