झाडावर बसलेला पक्षी शोधा
मुंबई, 24 नोव्हेंबर : सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या गोष्टी उपलब्ध आहेत. त्यामध्ये वन्यजीवांशी संबंधित रोमांचक व्हिडिओ, आश्चर्यकारक स्टंट्स, अफलातून डान्सर्स आणि कौतुकास्पद जुगाड लावणाऱ्या व्यक्तींच्या व्हिडिओ आणि फोटोंचा समावेश होतो. विविध प्रकारच्या गमतीशीर व्हिडिओंसोबतच अनेक प्रकारचे ट्रिकी फोटोज्, रीडल्स, ऑप्टिकल इल्युजन क्रिएट करणारे प्रश्न या ठिकाणी व्हायरल होतात. लोकांनादेखील असे गोंधळात टाकणारे रीडल्स आणि लॉजिकल रिझनिंगशी संबंधित प्रश्न सोडवायला आवडतात. आजकाल ऑप्टिकल इल्युजनशी संबंधित फोटोदेखील खूप चर्चेत आहेत. ही ऑप्टिकल इल्युजन्स म्हणजे डोळ्यांसमोर निर्माण केलेला भ्रम असतात. त्यामुळे अनेकदा निरीक्षण करूनही त्यामधील गोष्टी आपल्याला लवकर दिसत नाहीत. या ठिकाणी दिलेल्या फोटोतील सुकलेल्या झाडावर एक पक्षी बसल्याचा दावा केला जात आहे. पण तो पक्षी कोणालाच दिसत नाही. त्यामुळे त्याचा शोध घेणं हेच मोठं आव्हान आहे. अगदी तीक्ष्ण नजर असलेल्या व्यक्तीही हा फोटो बघून बुचकळ्यात पडल्या आहेत. झाडावर बसलेला पक्षी शोधणं कठीण सोशल मीडियावर एका सुकलेल्या झाडाचा फोटो व्हायरल झाला आहे. फोटोग्राफरनं अगदी योग्यवेळी हा फोटो आपल्या कॅमेऱ्यात कैद केला असावा. सुकून गेलेल्या झाडाचा फोटो अगदी साधा भासतो. पण, याच फोटोमध्ये एक पक्षी दडला आहे, असं सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. या झाडावर खरोखर असा एक पक्षी बसला आहे. मात्र, आपल्या रंगामुळे तो झाडाच्या खोडाशी एकरुप झाला आहे. त्यामुळेच झाडावर बसलेल्या पक्ष्याचा शोध घेताना नाकीनऊ येत आहेत. अनेकदा प्रयत्न करूनही काहींना पक्षी शोधणं शक्य झालेलं नाही. हे वाचा -
Optical Illusion : लागली पैज, हे 10 सेकंदात कोंबडीच्या पिल्ला शोधणं अशक्यच
पक्ष्याच्या रंगामुळे उडतो गोंधळ आपण जर झाडाच्या फोटोकडे बघितलं तर त्यावर काहीही दिसणार नाही. पण, झाडावर खोडाच्याच रंगाचा एक पक्षी बसलेला आहे. मन एकाग्र करून जर फोटोकडे बघितलं तर नक्कीच यश मिळेल आणि खोडावर बसलेला पक्षी दिसेल.
हा पहा इतका मोठा पक्षी
झाडाच्या खोडावर बरोबर मधोमध एक मोठा पक्षी बसलेला आहे. खोडाचा आणि पक्ष्याचा रंग सारखाच असल्यामुळे पक्षी सहज नजरेस पडत नाही. तो तुम्हाला दिसला तर तुमची निरीक्षणशक्ती उत्तम आहे. हे वाचा - ‘या’ फोटोतील चेहरे शोधताना अनेकांना फुटला घाम, जाणून घ्या काय आहे नेमका प्रकार? खरं तर असे ऑप्टिकल इल्युजन्स लहान मुलांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी वापरले जातात. मात्र, सोशल मीडियामुळे सध्या लहान मुलांसोबतच मोठ्या लोकांचंदेखील चांगलं मनोरंजन होत आहे. त्यांचा वेळही आनंदात जात आहे.