मुंबई 23 नोव्हेंबर : ऑप्टिकल इल्युजन फोटो, चित्रं डोळ्यांना नेहमी फसवतात. यात प्रत्येक वेळी असं काही ना काही दडलेलं असतं की ते शोधताना डोक्याला खूपच ताण द्यावा लागतो. मात्र अनेकांना हे आव्हान स्वीकारायला आवडतं. सध्या सोशल मीडियावर एक ऑप्टिकल इल्युजनसंबंधी फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये नेमके किती चेहरे आहेत, हे ओळखण्याचं आव्हान देण्यात आलं आहे. ‘टीव्ही 9 हिंदी’ ने याबाबत वृत्त दिलंय. सोशल मीडियावर विविध गोष्टी व्हायरल होत असतात, त्यात ऑप्टिकल इल्युजनचादेखील समावेश आहे. ऑप्टिकल इल्युजनचे अनेक प्रकार आहेत. काही फोटोंमध्ये एखाद्या व्यक्तीचा चेहरा लपलेला असतो, तर एखाद्या फोटोत एखादी वस्तू दडलेली असते. हे ऑप्टिकल इल्युजन सोडवणं तसं तर मोठं आव्हानात्मक काम आहे. कारण अनेकदा तुम्ही त्यामध्ये लपलेल्या गोष्टी शोधण्याचा कितीही प्रयत्न केलात, तरी त्या तुम्हाला सहजासहजी सापडत नाहीत. आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक फोटो घेऊन आलो आहोत, जो पाहून तुम्हाला डोक्याला चालना दिल्याशिवाय पर्याय राहणार नाही. हेही वाचा - Optical Illusion : लागली पैज, हे 10 सेकंदात कोंबडीच्या पिल्ला शोधणं अशक्यच ऑप्टिकल इल्युजनच्या एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत 9 चेहरे असून ते तुम्हाला शोधायचे आहे. पण हे आव्हान एखाद्या परीक्षेपेक्षा कमी नाही. कारण हा फोटो तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला वाटेल की, त्यातील चेहरे शोधणं सोपं आहे. प्रत्यक्षात मात्र दोन-चार चेहरे सोडल्यास उर्वरित चेहरे शोधण्यासाठी तुम्हाला डोक्याला चालना दिल्याशिवाय पर्याय राहणार नाही.
कसे शोधाल फोटोतील 9 चेहरे? दोन झाडं सरळ उभी असून त्याच्या फांद्या, पानं एकमेकांना चिकटलेली असल्याचं फोटोत तुम्हाला दिसेल. या झाडांच्या खाली झुडुपं असून, ती खूप दाट आहेत. या दाट झाडीतही चेहरे लपलेत. या फोटोत काही चेहरे स्पष्ट दिसतात. शोधण्याचा प्रयत्न केला तर वरच्या बाजूला तीन मोठे चेहरे दिसतात, आणि आणखी तीक्ष्ण नजरेनं पाहिल्यास खाली झुडपात दोन चेहरे दिसतील. आता तुम्हाला आणखी चार चेहरे शोधायचे आहेत. हे उर्वरित चेहरे तुम्हाला सापडत नसतील, तर काळजी करू नका, ते शोधण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू. जर तुम्ही चित्रातील पांढरा भाग व्यवस्थित पाहिला, तर तेथेच तुम्हाला बहुतांश चेहरे दिसतील. तसंच फोटोच्या उजवीकडे चेहऱ्याच्या वरच्या आणि खालच्या बाजूला प्रत्येकी एक चेहरा लपलेला आहे, आणि फोटोच्या डावीकडे आणि मध्यभागी असणारा चेहरा पाहिल्यास, त्याच्या जवळच तुम्हाला आणखी दोन चेहरे सापडतील. दरम्यान, ऑप्टिकल इल्जुनचं आव्हान स्वीकारून ते जिंकण्यास अनेकांना आवडतं. उलट ऑप्टिकल इल्युजनमध्ये लपलेली गोष्ट शोधणं जितकं कठीण असतं, तितकेच ती शोधताना डोक्याला चालना मिळते.