नवी दिल्ली 28 जून : सध्याच्या काळात फिट राहणं प्रत्येकाला आवडतं. धावपळीची जीवनशैली आणि वाढत्या ताण-तणावांमुळे आरोग्यावर परिणाम होऊ नये, तसंच गंभीर स्वरुपाचे आजार होऊ नयेत, यासाठी बहुतांश लोक चालणं, योगा, सायकलिंग आदी व्यायामांवर (Exercise) जास्त भर देतात. तसंच काही जण जिममध्ये जाऊन व्यायाम करतात. परंतु, जेव्हा आपण फिटनेससाठी (Fitness) व्यायामाला सुरूवात करतो, तेव्हा पहिल्या दिवशी कोणत्याही स्वरुपाचा व्यायाम केल्यावर आपल्याला अंगदुखी, स्नायुदुखी जाणवते. अशावेळी स्ट्रेचिंग (Stretching) फायदेशीर ठरतं. Slim Body Tips: पोटाची चरबी कमी करण्यासाठी हे एक ड्रिंक आहे फायदेशीर; आश्चर्यकारक आहेत परिणाम स्ट्रेचिंगमुळे स्नायूंना (Muscles) आराम मिळतो आणि शरीर लवचिक होतं. तसंच शरीराला दुखापत होत नाही. व्यायामानंतर स्नायू काहीसे कठीण झाल्याचं आपल्याला जाणवतं. त्यामुळे स्ट्रेचिंग करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. स्ट्रेचिंग करणं शरीरासाठी अनेकदृष्टिने फायदेशीर असतं. रोज सकाळी झोपेतून उठल्यावर तुम्ही स्ट्रेचिंगचे काही प्रकार केल्यास फिटनेस वाढण्यास नक्कीच मदत होईल. स्ट्रेचिंगमुळे शारीरिक समस्यादेखील दूर होतात. `झी न्यूज हिंदी`ने या विषयीची माहिती दिली आहे. फिटनेस ठेवण्यासाठी व्यायामासोबतच स्ट्रेचिंग करणं आवश्यक आहे. स्ट्रेचिंग करण्याचे अनेक फायदे आहेत. स्ट्रेचिंग केल्यानं शरीरातील रक्तप्रवाहाचा (Blood Circulation) वेग सुधारतो. सक्रियता वाढते. नियमित स्ट्रेचिंग केल्यानं ताणतणाव दूर होतात तसंच शरीराला आराम मिळतो. स्ट्रेचिंगचे काही प्रकार तुम्ही सकाळी झोपेतून जाग आल्यावर बेड मध्येच करू शकता. कोअर स्ट्रेचिंग (Core Stretching) केल्यास हातासह संपूर्ण शरीराला आराम मिळतो. शरीर मजबूत होतं. व्यायामामुळे किंवा जिम वर्कआउटनंतर स्नायूंना काहीशी सूज येते. मात्र कोअर स्ट्रेचिंगमुळे ही सूज कमी होते आणि स्नायूंना आराम मिळतो. स्नायूंची लवचिकता वाढते. फूल बॉडी स्ट्रेचिंग (Full Body Stretching) अर्थात पूर्ण शरीराचं स्ट्रेचिंग रोज करणं अत्यंत आवश्यक आहे. यात अधोमुखश्वानासनातील कृती अत्यंत फायदेशीर ठरते. त्यामुळे रोज सकाळी झोपेतून उठल्यावर या पद्धतीनं स्ट्रेचिंग करणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. Diet Tips: 40 वर्षानंतर आहाराची काळजी घ्याच; एक्सपर्टसने सांगितलेल्या या 3 सोप्या टिप्स वापरा लेग स्ट्रेचिंग (Leg Stretching) अर्थात पायाच्या स्ट्रेचिंगला अंजनेयासन असंही म्हटलं जातं. हे स्ट्रेचिंग केल्यानं खुब्याचे स्नायू मोकळे होतात. तसंच यामुळे पोटरी, गुडघ्यामागील शिरा आणि नितंबाच्या शिरांवर ताण येतो. हे स्ट्रेचिंग करण्यासाठी कष्ट कमी लागतात आणि पूर्ण पायांचा व्यायाम होतो. शरीर फिट राहण्यासाठी योग्य आहार, व्यायाम, वर्कआउटसोबतच स्ट्रेचिंगदेखील महत्त्वाचं आहे. स्ट्रेचिंगचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे तुम्ही स्ट्रेचिंगचे काही प्रकार रोज केल्यास फिटनेस वाढण्यास नक्कीच मदत होईल तसंच व्यायाम किंवा वर्कआउटमुळे स्नायुदुखी आणि अंगदुखीच्या समस्या देखील दूर होतील.