मुंबई, 11 डिसेंबर : अन्न घाईघाईने कधीही खाऊ नये, असे आपले वडीलधारे लोक लहानपणापासून सांगत आले आहेत. अन्न चांगले चावले पाहिजे आणि लगेच गिळू नये. केवळ आपले मोठे लोकच नाही तर डॉक्टरही सांगतात की, आपल्या आहाराबाबत कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा करू नये. जेवनाबाबतीत तुम्ही असेही ऐकले असेल की, एक घास किमान 32 वेळा चावून खाल्ला पाहिजे. अन्न नीट चावून खाल्याने तोंडात तयार होणारी लाळ अन्नाला मऊ करते आणि शरीराला आवश्यक हार्मोन्स सोडण्यास पुरेसा वेळ मिळतो. अन्न पचवण्यासाठी, ते शक्य तितक्या आतड्यांशी संपर्कात येणे आवश्यक आहे. अन्न 32 वेळा चावून खाण्याचे काय फायदे आहेत हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हरजिंदगीनुसार, केंद्रीय सरकारी रुग्णालयाच्या ईएसआयसी रुग्णालयाच्या आहारतज्ञ रितू पुरी यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
हे पदार्थ खाल्यानंतर चुकूनही पिऊ नका पाणी; नाहीतर पोटाचे होतील खूप हालअन्न 32 वेळा चावून खाण्याचे फायदे - अन्न योग्य प्रकारे चावल्याने शरीर पोटात पाचक एंझाइम सोडते जे अन्न तोडण्यास मदत करते. ज्यामुळे तुमचे शरीर त्याचे उर्जेमध्ये रूपांतर करू शकते. मात्र अन्नाचे पचन नीट न झाल्यास अपचनाशिवाय अॅसिडिटी, छातीत जळजळ, डोकेदुखी आणि बद्धकोष्ठता अशा समस्यांना तोंड द्यावे लागते.
- अन्न चांगले चावून खाल्ले तर शरीराला ते पचवण्यासाठी वेळ मिळतो. अशा परिस्थिती मेंदूला तुमचे पोट भरल्याचे संकेत मिळतात. अन्न चांगले चावल्यास आणि हळूहळू खाल्याने तुम्ही जास्त खाणे टाळता. त्यामुळे वजन वाढणेही थांबवू शकता. - व्यवस्थित चावून खाल्याने आपल्या संभाषण कौशल्यासही मदत होते. चावताना तोंडाभोवती असलेल्या स्नायूंचा वापर करून जबड्याचा विकास होण्यास मदत होते. त्यामुळे आपण शब्द अधिक चांगल्या प्रकारे उच्चारण्यास सक्षम होतो. - अन्न व्यवस्थित चावून खाण्याची सवय तोंडाच्या आरोग्यासाठीही खूप चांगली असते. अन्न चावल्याने लाळेचे उत्पादन उत्तेजित होते. लाळेमुळे तोंडातील बॅक्टेरिया धुण्यास मदत होते. ज्यामुळे हिरड्यांना आलेली समस्या टाळता येते.
एक इंच आल्याचा तुकडाच करेल कमाल; हिवाळ्यातील सर्व समस्यांपासून देईल आरामअन्न व्यवस्थित न चावण्याचे तोटे? नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या म्हणण्यानुसार, जेव्हा तुम्ही अन्न नीट चघळत नाही, तेव्हा पचनसंस्थेमध्ये गोंधळ होतो. शरीरात एन्झाईम्सच्या अपुऱ्या प्रमाणामुळे पोट फुगणे, जुलाब, छातीत जळजळ आणि ऍसिडचे जास्त उत्पादन, ओटीपोटात दुखणे, नाक वाहणे, डोकेदुखी, चिडचिड, कुपोषण, अपचन आणि गॅस यांसारख्या समस्या उद्भवतात.