जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / एक इंच आल्याचा तुकडाच करेल कमाल; हिवाळ्यातील सर्व समस्यांपासून देईल आराम

एक इंच आल्याचा तुकडाच करेल कमाल; हिवाळ्यातील सर्व समस्यांपासून देईल आराम

एक इंच आल्याचा तुकडाच करेल कमाल; हिवाळ्यातील सर्व समस्यांपासून देईल आराम

हिवाळ्यात या सर्व समस्यांपासून वाचण्यासाठी आपण खूप पदार्थ खाणे टाळतो. मात्र तरीही आपल्याला काही त्रासाचं सामना करावाच लागतो. हिवाळ्यातील काही सामान्य त्रासांवर आलं एक उत्तम उपाय आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 11 डिसेंबर : हिवाळ्याचे आगमन होताच आजारांनाही सुरुवात होते. मग ती सर्दी असो, घसादुखी असो किंवा त्वचेशी संबंधित समस्या असो. हिवाळ्यात या सर्व समस्यांपासून वाचण्यासाठी आपण खूप पदार्थ खाणे टाळतो. आहारात बरेच बदल करतो. मात्र तरीही आपल्याला काही त्रासाचं सामना करावाच लागतो. हिवाळ्यातील काही सामान्य त्रासांवर आलं एक उत्तम उपाय आहे. इंस्टाग्रामवर drdixa_healingsouls यांनी आल्याचा उपयोग आपण किती मार्गांनी करू शकतो याबद्दल माहिती दिली आहे. हिवाळ्यातील सर्दी, खोलक, घशाची खवखव, बद्धकोष्टता अशा समस्यांवर आल्याचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरू शकते. आल्यामध्ये मुबलक प्रमाणात अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-फंगल आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात, ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि अनेक आजारांपासून संरक्षण होते. तर मग जाणून घेऊया हिवाळ्यात आले किती फायदेशीर आहे आणि आपण त्याचा वापर कसा करू शकतो.

हिवाळ्यात नक्की खा काळे गाजर; वेट लॉससोबत या गंभीर आजाराचा धोका करतात कमी

अशाप्रकारे वेगवेगळ्या समस्यांसाठी वापरा आलं - तुम्हाला पचनाचा त्रास होत असेल, तर जेवणानंतर ताकात चिमूटभर आले पावडर टाकून प्या. हे तुमच्या पोटासाठी खूप चांगले सिद्ध होऊ शकते.

News18लोकमत
News18लोकमत

- 1 इंच ताजे आले किसून घ्या आणि नंतर अर्धा ग्लास पाण्यात 3-5 मिनिटे उकळा. ते गाळून मग प्या. तुमचा घसा दुखत असेल किंवा घशात खवखव असेल तर हा घरगुती उपाय खूप उपयोगी ठरेल. - 1 लिटर पाण्यात अर्धा चमचा अदरक पावडर टाकून 15 मिनिटे मंद आचेवर उकळवा. त्यानंतर ते गाळून चहाप्रमाणे प्या. यामुळे पोट फुगणे, घसा दुखणे तर कमी होईलच पण सर्दी-खोकल्याचा त्रासही कमी होईल आणि रोगप्रतिकारशक्तीही चांगली राहील. - आल्याचा 1 इंच तुकडा किसून घ्या यासोबत जिरे, धणे आणि बडीशेप घालून चहा करा. जेवल्यानंतर 1 तासानंतरच हा चहा प्या. हे फॅटी लिव्हर समस्या आणि लिव्हर संबंधित इतर समस्यांसाठी खूप चांगले सिद्ध होऊ शकते. - 5 मिली आल्याच्या रसात 1 चमचा मध आणि 5 थेंब लिंबाचा रस टाकून प्यायल्यास सूज येणे आणि भूक न लागणे या समस्या दूर होतील. यामुळे तोंडाची चवही सुधारते. - सुंठ आणि गूळ यांचे लाडू बनवा आणि जेवण्यापूर्वी थोडा वेळआधी घ्या. एक लाडू पुरेसा आहे. अपचनाच्या समस्येसाठी हे खूप प्रभावी आहे.

थंडीच्या दिवसात अनेकजण ही चूक करतात; कोंडा आणि केसांचे प्रॉब्लेम वाढतात

आल्याचे सेवन करताना ही काळजी घ्या आल्याचा प्रभाव उष्ण असतो आणि ज्यांना पोटाचे खूप त्रास होतात, पित्त खूप वाढते, रक्तस्रावाशी संबंधित समस्या असतात त्यांनी अद्रक घेणे टाळावे. त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आल्याचे सेवन करू नये. असो, तुमच्या आहारात कोणताही मोठा बदल वैद्यकीय सल्ल्याशिवाय करू नये.

जाहिरात

(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात