पुरेशा प्रमाणात पाणी पिण्याची गरज आपल्या सर्वांना माहीत आहे. पण पाणी पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती आणि कोणते पदार्थ खाल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये हे तुम्हाला माहिती आहे का?
झी न्यूजमध्ये दिलेल्या माहितीनुसार, टरबूजामध्ये 90 टक्क्यांहून अधिक पाणी असते. ते शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. ते खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास पाचक रस पातळ होतात, त्यामुळे सूज येते.
मोसंबी, आवळा असे लिंबूवर्गीय फळे खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन सी मिळते, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवते. मात्र त्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने पीएच लेव्हल बिघडू शकते. त्यामुळे पचनात समस्या निर्माण होतात.
केळी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. परंतु हे फळ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळावे. त्यामुळे पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. केली खाल्यानंतर किमान 30 मिनिटांनी पाणी प्यावे.
दूध प्यायल्याने आपल्या शरीराला पोषण मिळते. मात्र दूध प्यायल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने प्रथिनांचे चयापचय मंदावते. त्यामुळे आम्लपित्त आणि अपचनाचा त्रास होतो.
चहानंतरही लगेच पाणी पिऊ नये. चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने तुमच्या दातांचे नुकसान होते. (सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)