JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / अरे देवा! 2021 मध्ये कोरोनापेक्षाही भयंकर व्हायरसचं संकट? अज्ञात आजाराचा रुग्ण सापडला

अरे देवा! 2021 मध्ये कोरोनापेक्षाही भयंकर व्हायरसचं संकट? अज्ञात आजाराचा रुग्ण सापडला

या रुग्णाचे नमुने इबोला टेस्टसाठी पाठवण्यात आले आहेत आणि हा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास हा रुग्ण म्हणजे अज्ञात आजाराचा झीरो पेशंट असू शकतो.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कांगो, 26 डिसेंबर : जसजसं या वर्षाचा शेवटचा दिवस जवळ येतो आहे, तसतशी प्रत्येकाला पुढच्या वर्षाची उत्सुकता लागली आहे. तशी नव्या वर्षाची प्रतीक्षा प्रत्येक जण नेहमी करतो मात्र यंदा 2020 हे वर्ष कधी एकदा सरतं असंच झालं आहे याचं कारण म्हणजे या वर्षात कोरोनाव्हायरसचं थैमान आणि त्यात वर्षाअखेर त्यानं घेतलेला नवा भयंकर अवतार. पण पुढच्या वर्षात कोरोना लस येईल आणि सर्वकाही सुरळीत होईल अशी आशा असतानाच आता नव्या व्हायरसचं संकट येऊन ठेवलं आहे. 2021 मध्येही नवा व्हायरस येतोय की काय अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. आफ्रिकेतल्या कांगोमधील एका रुग्णामध्ये Hemorrhagic Fever सारखी लक्षणं दिसून आली आहेत. या रुग्णाला आयसोलेट करून त्याचे रिपोर्ट इबोला टेस्टसाठी पाठवण्यात आले आहेत. पण हा Disease X  म्हणजे अज्ञात आजाराचा धोका असू शकतो, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. हा रुग्ण म्हणजे Disease X चा पेशंट जीरोही असावा, अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. हा आजार कोरोनासारखा वेगानं पसरणारा आणि इबोलासारखा जीवघेणा असू शकतो, असंही तज्ज्ञ म्हणाले. हे वाचा -  नव्या कोरोनानं वाढली चिंता, लंडनहून आलेल्या एकाच कुटुंबातील 3 सदस्य पॉझिटिव्ह आज तकनं सीएनएन रिपोर्टचा हवाला देत दिलेल्या वृतानुसार कांगोतील रुग्णावर उपचार करणारे डॉ. डेडिन बोन्कोले यांनी सांगितलं की, नवी महासाथ काल्पनिक नाही. वैज्ञानिक पुराव्याच्या आधारे निर्माम झालेली ही भीती आहे. इबोलाबाबतदेखील कुणाला माहिती नव्हती. नव्या आजाराचीही भीती वाटणं साहजिकच आहे. हे वाचा -  Coronavirus बरोबर आता ब्लॅक फंगसचं सावट; मृत्यूदर वाढला कांगोच्याच येम्बुकु मिशन हॉस्पिटलमध्येच पहिल्यांदाच  अज्ञात आजार इबोला म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यावेळी  88 टक्के रुग्ण आणि  80  टक्के कर्मचाऱ्यांचा बळी या आजारानं घेतला होता. त्यामुळे कांगोतील महिलेचे नमुने इबोला टेस्टसाठी पाठवण्यात आले. 1976 इबोला व्हायरसचा शोध लावणारे प्रोफेसर जीन जेसक्वीस मुयेम्बे टॅम्फमही नव्या व्हायरसचा शोध घेत आहेत. ते म्हणाले, आपण अशा जगात आहोत, जिथं नवे व्हायरस येणार आणि त्यामुळे माणसांवरील धोका कायम आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या