जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / नव्या कोरोनानं वाढली चिंता, लंडनहून आलेल्या एकाच कुटुंबातील 3 सदस्य पॉझिटिव्ह

नव्या कोरोनानं वाढली चिंता, लंडनहून आलेल्या एकाच कुटुंबातील 3 सदस्य पॉझिटिव्ह

तर कोरोना रुग्णांच्या मृत्यूची एकूण संख्या 3121 एवढी झाली आहे.

तर कोरोना रुग्णांच्या मृत्यूची एकूण संख्या 3121 एवढी झाली आहे.

इंग्लंड आणि ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांपैकी नागपूर, औरंगाबाद आणि कल्याणमधील प्रत्येकी एक जण कोरोना पॉझिटिव्ह सापडला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मेरठ, 26 डिसेंबर : जगभरात कोरोनाच्या नव्या रुपानं दहशत पसरली आहे. भारतात चिंता वाढत असतानाच आणखीन एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. इंग्लंडहून परत मायदेशी परतलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये लंडनहून आलेल्या 3 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. या तिघांना नव्या कोरोनाची लागण झाल्याची भीती आणि संशय व्यक्त केला जात आहे. त्यांच्या चाचण्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार 14 डिसेंबरला एकाच कुटुंबातील तीन जण इंग्लंडहून भारतात आले होते. त्यांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासन सतर्क झालं आहे. महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यांमध्ये रुग्ण इंग्लंड आणि ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांपैकी नागपूर, औरंगाबाद आणि कल्याणमधील प्रत्येकी एक जण कोरोना पॉझिटिव्ह सापडला आहे. या तिघांचे नमुने पुण्यातील NIV लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. सध्या या तिघांवरही उपचार सुरू आहेत. पुण्याच्या लॅबमधून येणाऱ्या रिपोर्टकडे संपूर्ण भारताचं लक्ष लागलं आहे. हे वाचा- COVID-19 चिंता वाढवणारी बातमी, Pfizer नंतर आणखी एका लशीमळे अॅलर्जी ब्रिटनमध्ये कोरोनाव्हायरसचा नवा स्ट्रेन आढळल्यानंतर संपूर्ण जग सावध झाला आहे. भारतानंही खबरदारीचा उपाय म्हणून ब्रिटनमधून 22 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून ते 31 डिसेंबरपर्यंत या कालावधीत येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. तसंच विमानतळांवर प्रवाशांची कोविड चाचणी (Covid Test)अनिवार्य करण्यात आली आहे. यावेळी काही लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या कालावधीत 45 नागरिक ब्रिटनमधून कल्याणमध्ये परतले आहेत. त्यांच्या नावाची यादी राज्य सरकारने कल्याण-डोंबिवली महापालिकेकडे सुपूर्द केली आहे आणि या सर्वांची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात