JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / नव्या कोरोनाच्या दहशतीत मोठा दिलासा! अ‍ॅक्टिव्ह कोरोना रुग्णांच्या संख्येत घट

नव्या कोरोनाच्या दहशतीत मोठा दिलासा! अ‍ॅक्टिव्ह कोरोना रुग्णांच्या संख्येत घट

देशातील कोरोना रुग्णांची आकडेवारी दिलासादायक आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 05 जानेवारी : एकिकडे देशात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची (coronavirus new strain) लागण झालेले रुग्ण वाढत आहेत. तर दुसरीकडे मात्र अ‍ॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या घटताना दिसते आहे. केंद्र सरकारनं देशातील कोरोना रुग्णांबाबत आकडेवारी जारी केली. ही आकडेवारी खूपच दिलासादायक आहे. गेल्या 6 महिन्यांत पहिल्यांदाच अ‍ॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या  2.5 लाखांहून कमी झाली आहे. भारतात अ‍ॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या घटते आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिली. केंद्र सरकारनं पत्रकार परिषद घेत देशातील कोरोना रुग्णांची आकडेवारी जारी केली आहे.

संबंधित बातम्या

भारतात सध्या एकूण कोरोना रुग्ण आहेत. त्यापैकी 44% अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. ज्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर 56% रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं किंवा लक्षणंच नाहीत त्यांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. हे वाचा -   Corona vaccine ची प्रतीक्षा अखेर संपली! सरकारनं जारी केली कोरोना लसीकरणाची तारीख 6 महिन्यानंतर सक्रिय रुग्ण 2.5 लाखांहून कमी आणि त्यात घट होत आहे. दैनंदिन पॉझिटिव्हीटी दरात सातत्याने घट होते आहे. सलग 11 व्या दिवशी दैनंदिन मृत्यूंची संख्या 300 हून कमी आहे. देशातील पॉझिटिव्ही रेट हा 1.97% आहे.  3 डिसेंबर ते 5 जानेवारी दरम्यान हा दर 3 टक्क्यांहून कमी आहे. सरासरी दैनंदिन बरे झालेली रुग्णसंख्या सरासरी दैनंदिन नवीन रुग्णसंख्येपेक्षा जास्त राहिल्याने (गेल्या 5 आठवड्यात) सक्रिय रुग्णसंख्येत सातत्याने घट झाली आहे. हे वाचा -  ‘आमच्यासाठी जीव महत्त्वाचा’, कोरोना लशीच्या युद्धाला कंपन्यांकडूनच पूर्णविराम जगात खालील आकडेवारीसंदर्भात सर्वात कमी संख्या असलेल्या देशात भारताचे स्थान कायम  आहे. प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे रुग्णसंख्या 7504 आहे. सक्रिय रुग्ण 1032 आणि मृत्यू 108 आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या