नवी दिल्ली, 05 जानेवारी : भारतात दोन कोरोना लशींना (corona vaccine) परवानगी मिळाल्यानंतर या दोन लशींवरून युद्ध सुरू झालं होतं. स्वदेशी विरुद्ध विदेशी... कोणती कोरोना लस (COVID-19 vaccine) सुरक्षित आणि प्रभावी असं वॉर सुरू झालं. दोन्ही कंपन्या एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करू लागले. आपलीच लस उत्तम असल्याचा दावा करू लागले. अखेर या कंपन्यांनच या युद्धाला पूर्णविराम दिला आहे. दोन्ही कंपन्यांनी एकत्रितरित्या काम करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोना लशीचं उत्पादन घेऊन भारत आणि जगाला कोरोना लस पुरवण्यासाठी पुणे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute of India) आणि भारत बायोटेक (Bharat Biotech) एकत्र आले आहेत. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला (Adar Poonawala) आणि भारत बायोटेकचे एमडी डॉ. कृष्णा इल्ला (Dr. Krishna Ella) यांनी आपापल्या कंपनीच्या वतीनं एकत्रितरित्या पत्रक जारी केलं आहे.
हे वाचा - भारतीयांचं मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष? आजार गंभीर होण्याआधीच काळजी घ्या
या पत्रकात म्हटलं आहे की, भारत आणि जगातील जास्तीत जास्त जीव वाचवणं हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. यासाठी लस गरजेची आहे.
भारतात आता दोन कोरोना लशींच्या आपात्कालीन वापराला मंजुरी देण्यात आली आहे. या लशींचं उत्पादन, पुरवठा आणि वितरणावर लक्ष केंद्रीत करणं गरजेचं आहे. ज्यामुळे जास्तत जास्त लोकांना सुरक्षित आणि प्रभावी लस मिळेल. आमच्या दोन्ही कंपनी हेच करत आहेत. कोणत्याही अडचणीशिवाय देश आणि जगाला लशीचा पुरवठा करणं ही आमची ड्युटी आहे. आमच्या दोन्ही कंपन्या लशीवर ठरलेल्या योजनेनुसारच काम करत आहेत.
हे वाचा - भारतीयांचं मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष? आजार गंभीर होण्याआधीच काळजी घ्या
लोक आणि देशांसाठी लस किती महत्त्वाची आहे याची पूर्ण जाणीव आम्हाला आहे. त्यामुळे आम्ही जगाला आमची कोरोना लस देण्यासाठी एकत्रित प्रतिज्ञा घेतली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.