भारतात दोन कोरोना लशींच्या आपात्कालीन वापराला मंजुरी देण्यात आली आहे. भारत बायोटेकची कोवॅक्सिन आणि पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटनं ऑक्सफोर्ड-अॅस्ट्राझेनेकाच्या मदतीनं तयार केलेली कोव्हिशिल्ड या दोन लशी आहेत. हे वाचा - तुम्हालाही Corona vaccine हवी का? कशी करावी नोंदणी पाहा एका क्लिकवर लशींची सध्याची उपलब्धता बघता केंद्र सरकारने ज्या गटांना अधिक धोका आहे, अशा गटांची प्राधान्याने लशीकरणासाठी निवड केली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात 30 कोटी नागरिकांना लस पुरवण्याचं सरकारचं लक्ष्य आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी (Health workers) आणि फ्रंटलाईन वर्कर्सचा (Frontline Workers) समावेश आहे. त्यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यात 50 वर्षांवरील व्यक्ती तसेच 50 पेक्षा कमी वयाच्या परंतु अन्य गंभीर आजार (comorbid) असणाऱ्या व्यक्तींना प्राधान्याने लस दिली जाणार आहे. 3 कोटी लोकांना मोफत लस दिली जाणार आहे. कोरोना प्रतिबंधक लशीकरणासाठी पात्र लाभार्थ्यांना नोंदणी आवश्यक आहे. नोंदणीनंतर संबंधित व्यक्तीस लशीकरणाचे ठिकाण, वेळ याची माहिती दिली जाणार आहे. हे वाचा - कधी, कुठे, कुणाला मिळणार CORONA VACCINE? कोरोना लशीकरणाची प्रक्रिया एका क्लिकवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना वॅक्सिन वितरण, डेटा ठेवण्यासाठी आणि लोकांना वॅक्सिनसाठी रजिस्टर करण्यासाठी कोविन (Co-WIN App) नावाचं एक अॅप बनवलं आहे. देशाचे नागरिक जे सेल्फ वर्कर्स नाहीत, ते वॅक्सिनसाठी CoWIN अॅपवर सेल्फ-रजिस्टर करू शकतात. हे अॅप गुगल प्ले स्टोअर किंवा अॅपल प्ले स्टोअरवर डाउनलोड करावं लागेल. लस देण्यास सुरुवात केल्यानंतर, जे लोक अॅपवर आधीपासून रजिस्टर असतील त्यांना लवकरात लवकर वॅक्सिन मिळेल.There are 4 primary vaccine stores called GMSD located in Karnal, Mumbai, Chennai and Kolkata and there are 37 vaccine stores in the country. They store vaccines in bulk and distributes further: Union Health Secretary Rajesh Bhushan pic.twitter.com/XLemvehiH5
— ANI (@ANI) January 5, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccine, Coronavirus