नवी दिल्ली, 6 जानेवारी : सध्या सगळं जग कोरोनाशी (corona) लढत युद्धपातळीवर लस शोधत आहे. ज्या देशांनी लसी यशस्वी चाचण्यांनंतर मंजूर केल्यात ते योग्य प्रकारे सगळं व्यवस्थापन करत नागरिकांना लवकरात लवकर लस देण्याच्या प्रयत्नात आहेत. भारतही (India) याला अपवाद नाही. मात्र आता भारतीयच लस घेण्यास उत्सुक दिसत नाही आहेत. भारतातील नागरिकांपैकी (Indian citizens) तब्बल 69% नागरिक मात्र लस घेण्याबाबत थोडे संभ्रमातच (hesitant) असल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. ‘लोकल सर्कल्स’ (local circles) हा एक कम्युनिटी मीडीया मंच आहे. या मंचाच्या माध्यमातून हे सर्वेक्षण करण्यात आलं. ऑक्टोबर 2020 पासून लोकल सर्कल्स ही संस्था लोकांचे या विषयाबाबतचे प्रतिसाद जमवते आहे. लशीबाबत जनसामान्यांमध्ये नक्की कुठली भावना आहे ते समजून घेणं हा या सर्वेक्षणाचा उद्देश होता. ऑक्टोबरमध्ये (October) केलेल्या सर्वेक्षणात 61% नागरिकांनी लस घेण्याबाबत संभ्रम जाहीर केला होता. मात्र फायजर आणि मॉडर्नाच्या चाचण्या यशस्वी झाल्याच्या बातम्या आल्यावर नोव्हेंबरमध्ये हा टक्का खाली घसरत 59% वर आला. मात्र त्यानंतर सीरम इन्स्टिट्यूटच्या (serum institute) माध्यमातून ऑक्सफर्ड एस्ट्राझेन्का या लशीची चाचणी यशस्वी झाली. मात्र त्यावेळी लोकल सर्कल्सनं घेतलेल्या सर्व्हेमध्ये संभ्रमात असलेल्या नागरिकांचा टक्का एकाएकी उंचावत 69% वर पोचला. हे वाचा - फक्त इंजेक्शन नाही तर नाकावाटेही दिली जाणार स्वदेशी कोरोना लस; नागपुरात संशोधन याशिवाय लोकल सर्कल्सनं आरोग्य कर्मचाऱ्यांमध्येही असाच सर्व्हे घेतला. लोकल सर्कल्सचे सदस्य डॉ. अब्दुल गफूर यांनी हा सर्वे केला. यात त्यांना आढळलं, की बहुसंख्य आरोग्य कर्मचारी लस घ्यावी की नको या संभ्रमात आहेत. ही संख्या 55% इतकी आहे. या आरोग्य कर्मचाऱ्यांना लशीचे साईड इफेक्ट्स काय होतील, ती कितापत प्रभावी ठरेल अशा शंका आहेत. दुसरीकडे सामान्य नागरिकांच्या मते लस किती प्रभावी आहे, तिचे साइड इफेक्ट्स काय आहेत याबाबत पुरेशी माहिती उपलब्ध आहे. मात्र कोरोनाच्या केसेसमध्ये लक्षणीय घट दिसत असल्याने लोक लस घेण्याबाबत आता उदासीन होत असल्याचं चित्र आहे. हे वाचा - कोरोनाची लस आहे की, जेवणाचे डबे? ड्राय रनमध्ये सायकलवरुन Vaccine घेऊन पोहोचला DCGI नं भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या लसीला 12 वर्षांवरील मुलांसाठी हिरवा कंदील दाखवलाय. मात्र लोकल सर्कल्सनं पालकांमध्ये घेतलेल्या सर्व्हेमध्ये असं दिसलं, की केवळ 26% पालक एप्रिल 2021 पर्यंत लस उपलब्ध झाली तर आपल्या मुलांना ती टोचून घेण्यास तयार आहेत. 56% पालक म्हणत आहेत, की ते अजून तीन महिने थांबून समोर येणाऱ्या निष्कर्षांचा आणि माहितीचा अंदाज घेत त्यावर पाल्यांना लस द्यायची की नाही हे ठरवतील. 12% पालक आपल्या पाल्याला लस टोचून घेण्यास नाही म्हणत आहेत.