मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /कोरोनाची लस आहे की, जेवणाचे डबे? ड्राय रनमध्ये सायकलवरुन Vaccine घेऊन पोहोचला कर्मचारी

कोरोनाची लस आहे की, जेवणाचे डबे? ड्राय रनमध्ये सायकलवरुन Vaccine घेऊन पोहोचला कर्मचारी

कधी एकदा लस येते आणि चिंता दूर होते, असा विचार प्रत्येक नागरिक करीत आहे. मात्र त्यासाठी लागणाऱ्या यंत्रणेचं काय?

कधी एकदा लस येते आणि चिंता दूर होते, असा विचार प्रत्येक नागरिक करीत आहे. मात्र त्यासाठी लागणाऱ्या यंत्रणेचं काय?

कधी एकदा लस येते आणि चिंता दूर होते, असा विचार प्रत्येक नागरिक करीत आहे. मात्र त्यासाठी लागणाऱ्या यंत्रणेचं काय?

वाराणसी, 6 जानेवारी : गेल्या मार्च महिन्यापासून कोरोनाने लोकांचं जगणं अवघड केलं आहे. कधी एकदा लस येते आणि चिंता दूर होते, असा विचार प्रत्येक नागरिक करीत आहे. लवकरच इतर देशांप्रमाणे आपल्या देशातही कोरोनाचं लसीकरण सुरू होणार असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाचं ड्राय रन सुरू आहे. (staff arrived in the dry run carrying the vaccine from the bicycle)

उत्तर प्रदेशात कोरोना लस लावण्यासाठी (Covid vaccine) ड्राय रनचं आयोजने (Dry Run) करण्यात आलं होतं. याअंतर्गत वाराणसीत (Varanasi) कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) लशीबाबत सहा ठिकाणी आणि तीन शहरी, तीन ग्रामीण भागात लसीकरणाचं ट्रायल झालं. मात्र या ट्रायलमध्ये असे फोटो समोर आले आहेत, जे पाहून प्रशासनाचा निष्काळजीपणा अधोरेखित होत आहे. (staff arrived in the dry run carrying the vaccine from the bicycle) समोर आलेल्या फोटोंमुळे प्रशासनावर दबाव निर्माण झाला आहे. हा फोटो सायकलीवरुन लशीचा डबा घेऊन जाणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्याची आहे. जेथे प्रशासन लसीबाबत आणि व्यवस्थेची पूर्ण तयारी झाल्याचा दावा करीत आहे व दुसरीकडे सायकलवर लशीचा डब्बा घेऊन जात आहे.

हे ही वाचा-आता कोरोना विषाणूला मारा एक क्लिकवर; 16 वर्षांच्या मुलाने शोधली भन्नाट आयडिया!

जरी ही ड्राई-रन असली तरी त्याला खऱ्या खुऱ्या पद्धतीनेच करण्यात आलं होतं. साहजिकच एवढी मोठी चूक समोर आल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की, “कोरोना लसीच्या ड्राय-रनमध्ये कोणतीही वास्तविक लस नव्हती, फक्त रिकाम्या डब्ब्यांमधून ड्राय-रन झाली होती. महिलेने रूग्णालयात सायकलद्वारे लस पोचविल्याची बातमी समोर आली आहे. मात्र सायकलवर असलेल्या डब्ब्यांमध्ये लस नव्हती. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. (staff arrived in the dry run carrying the vaccine from the bicycle)

ते पुढे म्हणाले की, या रुग्णालयात लशीचा स्टोरेज पॉइंट बसविला आहे. ती लस चौका घाटातून जाणार नव्हती. त्यामुळे तेथे वाहनाची तयारी करण्यात आली नव्हती.  चौका घाटाच्या कर्मचार्‍यांकडून झालेल्या गैरसमजामुळे लसीचे डबे सायकलमधून पाठविण्यात आले. यासाठी कर्मचार्‍यांना स्पष्टीकरण नोटीस बजावण्यात आली आहे. ड्राय रनमध्ये मिळालेल्या अभिप्रायाच्या आधारे, वास्तविक लसीकरण फेरी घेण्यात येईल. आता या फोटोंवर प्रशासन स्पष्टीकरण देत असली तरी ही नक्कीच यंत्रणेची पोलखोल आहे.

First published:

Tags: Corona vaccine, Corona virus in india