प्रतिकात्मक छायाचित्र
नवी दिल्ली, 07 सप्टेंबर : जर तुम्हाला केवळ झोपून (Sleep) राहण्यासाठी पैसे मिळत असतील तर तुम्ही अशा प्रकारच्या स्पर्धेत (Competition) भाग घेणार नाही का? आणि ही स्पर्धा जिंकल्यानंतर तुम्हाला लाखो रुपये मिळणार असतील तर? भारतात (India) अशा प्रकारची स्पर्धा नुकतीच झाली, ज्यात सर्वांत जास्त वेळ झोपून राहणाऱ्या व्यक्तीला तब्बल 6 लाख रुपयांचं बक्षीस देण्यात आलं. या स्पर्धेत तब्बल 4.5 लाख स्पर्धक सहभागी झाले होते. या सर्वांमध्ये पश्चिम बंगालमधील (West Bengal) श्रीरामपूर, हुगळी येथे राहणाऱ्या एका तरुणीने बाजी मारली आहे. तिने तब्बल सलग 100 दिवस 9 तास झोपून विक्रम (Making a Record of Sleeping) करत ही स्पर्धा जिंकली. ‘ आजतक ’ने याबाबतचं वृत्त दिलंय. पश्चिम बंगालच्या हुगळीत राहणाऱ्या एका तरुणीने ‘सर्वोत्कृष्ट स्लीपर’चा (Best Sleeper) किताब पटकावला आहे. 4.5 लाख स्पर्धकांमधून तिने हा पुरस्कार पटकावला असून, या युवतीचे नाव आहे त्रिपर्णा चक्रवर्ती (Triparna Chakraborty). मिळालेल्या विजेतेपदाबद्दल बोलताना ती म्हणते, ‘अखिल भारतीय स्तरावर अशा प्रकारची स्पर्धा आयोजित केली जात असल्याचे ऑनलाइन वेबसाइटद्वारे मला कळाले. त्यानंतर मी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अर्ज केला. कारण लहानपणापासूनच मला झोपण्याची खूप आवड आहे. जेव्हाही मला झोप येते, तेव्हा मी बिनधास्तपणे झोप काढते. अनेकवेळा मला परीक्षेच्या वेळीही झोप आली होती.’ अशी झाली स्पर्धा या स्पर्धेसाठी देशभरातून एकूण 4.5 लाख अर्ज आले होते. ज्यामध्ये 15 स्पर्धकांची निवड करण्यात आली. त्यातून फायनलसाठी 4 जणांची निवड करण्यात आली. यात त्रिपर्णाने बाजी मारली. तिने सलग 100 दिवस 9 तास झोपून विक्रम केला. स्पर्धा जिंकल्याबद्दल तिला 6 लाखांचं बक्षीसही मिळाले आहे. तिला प्रत्येकी एक लाख रुपयांचे सहा चेक देण्यात आले. हे वाचा - दीपिका पदुकोणसारखं फिट आणि स्टायलिश दिसायचंय? पाहा दीपिकाचं फिटनेस रुटीन आवडीच्या वस्तुंची खरेदी करणार 6 लाख रुपयांचं बक्षीस मिळाल्यामुळे त्रिपर्णाला खूप आनंद झाला. या रकमेतून आवडीच्या आणि गरजेच्या वस्तू खरेदी करणार असल्याचंही तिने सांगितलं. त्रिपर्णा अमेरिकेतील एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करते. सध्या तिचे ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू आहे. कामासाठी तिला रात्री झोपेतून उठावं लागतं. ज्याची भरपाई ती दिवसभर झोपून करते. हे वाचा - तुमचेही केस अकाली पांढरे झालेत? ही असू शकतात कारणं, वेळीच घ्या काळजी दरम्यान, जास्तवेळ झोपणाऱ्या व्यक्तीला अनेकदा ‘आळशी’ म्हणत चिडवलं जात. पण जास्तवेळ झोपणंदेखील अनेकदा फायद्याचं ठरू शकतं. कारण जगात कधी कोणत्या स्पर्धा होतील, याचाही काही नेम राहिलेला नाही. अशीच एखादी झोपणाऱ्या व्यक्तींसाठी स्पर्धा झाली, तर त्यात झोपाळू व्यक्ती नक्कीच बाजी मारू शकतात.