JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / 6 फूट सोशल डिस्टन्सिंग नाही पुरेसं; तब्बल 18 फुटांपर्यंत जाऊ शकतो Coronavirus

6 फूट सोशल डिस्टन्सिंग नाही पुरेसं; तब्बल 18 फुटांपर्यंत जाऊ शकतो Coronavirus

हवा वाहत असेल, तर खोकल्यानंतर किंवा शिंकल्यानंतर ड्रॉपलेट्सच्या माध्यमातून कोरोनाव्हायरस दूरपर्यंत जाऊ शकतो.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 21 मे : कित्येक महिन्यांपासून संपूर्ण जग कोरोनाव्हायरसशी (Coronavirus) दोन हात करत आहे. कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी बहुतेक देशांनी लॉकडाऊन लागू केला आहे. मात्र आता हा लॉकडाऊन हळूहळू शिथील केला जातो आहे. काही प्रमाणात सूट दिली जाते आहे. मात्र अशावेळी सोशल डिस्टन्सिंगचं (Social distancing) काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्यात. मात्र सध्या सोशल डिस्टन्सिंगसाठी जे अंतर निश्चित करण्यात आलं आहे ते पुरेसं नाही, त्या अंतराच्या तीनपट अंतरापर्यंत कोरोनाव्हायरस पसरू शकतो, असं एका संशोधनात दिसून आलं आहे. सध्या सर्वत्र दोन व्यक्तींमध्ये 6 फुटांचं अंतर ठेवण्याचा सल्ला दिला जातो आहे. मात्र कोरोनाव्हायरस तब्बल 18 फूट अंतरापर्यंत पसरू शकतो, असं एका संशोधनात दिसून आलं आहे. हे वाचा -  वर्षभरात कोरोना व्हायरस होणार नष्ट, 6 महिन्यांमध्ये येणार बाजारात औषध! नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार हलकी हवा वाहत असेल, तर सौम्य खोकल्यानंही व्हायरस असलेले ड्रॉपलेट्स 18 फुटांपर्यंत हवेत राहू शकतात. साइप्रसच्या निकोसिया युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी सांगितलं, कोरोनाव्हायरसतचा हवेतील प्रसाराला समजून घेण्याची गरज आहे. फिजिक्स ऑफ फ्ल्युड जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित झालं आहे. हेल्थलाइन नुसार, संशोधकांनी एक कॉम्प्युटर सिम्युलेशन मॉडेल तयार केलं आहे. ज्यामार्फत ते खोकल्याद्वारे निघणाऱ्या लाळेच्या कणांच्या हवेतील गतिविधींचा अभ्यास करत आहेत. अभ्यासानुसार, पाच किलोमीटर प्रति तास वेगानं वाहणाऱ्या हलक्या हवेत माणसाच्या लाळेचे कण पाच सेकंदात अठरा फुटांपर्यंत जाऊ शकतात. हे वाचा -  कोरोना रुग्णाच्या मृतदेहात किती वेळ राहतो व्हायरस? ICMRने दिली महत्त्वाची माहिती संशोधनाचे अभ्यासक, डिमिट्रिस ड्रिकाकिस यांनी सांगितल, हे ड्रॉपलेट्स क्लाउड वेगवेगळ्या उंचीचे वयोवृद्ध व्यक्ती आणि लहान मुलं दोघांवरही प्रभाव टाकू शकतात. जर कमी उंचीच्या व्यक्ती या ड्रॉपलेट्सच्या संपर्कात येतात तर त्यांना याचा जास्त धोका आहे. दरम्यान याबाबत अधिक अभ्यास करत असल्याचंही शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. संकलन, संपादन - प्रिया लाड

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या