नवी दिल्ली, 7 मार्च : देशात कोरोना काळात सबंधित औषधांचा मोठा तुटवडा होता. ऑक्सिजनची कमी आणि इतरही अनेक गोष्टींची मोठी कमी होती. अशात रात्रीच्या वेळी एखाद्या व्यक्तीला अतिशय अर्जंट औषधांची गरज भासल्यास 24 तास मेडिकल सर्वांत महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे वेळीअवेळी एखाद्याला 24 तास मेडिकल सेवा फायदेशीर ठरते. अनेकदा ज्यावेळी गरज भासते त्यावेळी नेमकी 24 तास मेडिकल कुठे आहेत हे लक्षात येत नाही. काही 24 तास मेडिकल औषधांची घरपोच डिलीव्हरीही करतात. नवी मुंबईत कुठे आणि कोणती आहेत 24 Hours Medical Chemists - वेलनेस फॉरएव्हर (Wellness Forever) - नवी मुंबईतील वाशी येथे हे 24 तास मेडिकल उपलब्ध आहे. हे मेडिकल औषधांची घरपोच डिलीव्हरीही देतं. तसंच कॅश किंवा कार्ड असं कोणत्याही प्रकारे पेमेंट इथे करता येतं. पत्ता - शॉप 11, 12, बिल्डिंग नं. F1, अदिती अपार्टमेंट, शबरी हॉटेलजवळ, वाशी सेक्टर 9, नवी मुंबई - 400703 फोन - 02227668881 अॅपल केमिस्ट (Apple Chemist) - या 24 तास मेडिकलमध्ये सर्व औषधांसह इतरही मेडिकल इक्विपमेंट उपलब्ध आहेत. तसंच फ्री होम डिलीव्हरीही उपलब्ध आहे. त्याशिवाय रजिस्टर्ड ग्राहकांसाठी ऑफर-डिस्काउंट्सही दिले जातात. पत्ता - चतुर्भुज, सेक्टर 21, खारघर, नवी मुंबई - 410210 फोन - 9892974241, 02227741741
वेलनेस फॉरएव्हर (Wellness Forever) - नेरुळमध्ये Wellness Forever 24 तास मेडिकल उपलब्ध आहे. हे मेडिकल औषधांची घरपोच डिलीव्हरीही देतं. पत्ता - शॉप 7,8, विघ्नहर, सेक्टर 21, नवी मुंबई, नेरुळ - 400706 फोन - 02227705834 ग्लोबल केमिस्ट (Global Chemist) - ग्लोबल केमिस्ट खारघरमध्ये असून हे 24 तास उपलब्ध असतं. या मेडिकलमध्ये औषधांवर 10 टक्के डिस्काउंटही दिला जातो. पत्ता - शॉप 14, श्री बालाजी कृपा बिल्डिंग, प्लॉट 19A, शिल्प चौक रोड, खारघर, नवी मुंबई - 410210 फोन - 8369009661
अपोलो मेडिकल (Apollo Medical) - कोपरखैरणे येथील अपोलो मेडिकल 24 तास उपलब्ध असतं. या मेडिकलची फ्री होम डिलीव्हरी असून सकाळी 8 ते संध्याकाळी 7 पर्यंत ही सुविधा सुरू असते. पत्ता - शॉप 7, महावीर श्रद्धा बिल्डिंग, प्लॉट 12, कोपरखैरणे, डीमार्टजवळ, सेक्टर 14, नवी मुंबई - 400709 फोन - 02227549809