JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / मेथी-ओव्याचं पाणी अनेक समस्या करेल दूर, जाणून घ्या फायदे

मेथी-ओव्याचं पाणी अनेक समस्या करेल दूर, जाणून घ्या फायदे

रोज सकाळी रिकाम्यापोटी मेथी-ओव्याचं पाणी प्यायल्यामुळे पचनशक्ती सुधारण्यासही मदत होते.

जाहिरात

Photo: shutterstock

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 डिसेंबर : आपल्या घरामध्येच कित्येक वेळा अनेक औषधी पदार्थ असतात. मात्र, त्याबाबत माहिती नसल्यामुळे आपण त्या गोष्टींचा उपयोग करून घेत नाही. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यावं हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल. पण याऐवजी, मेथी आणि ओव्याचं पाणी (Methi Ajwain water benefits) प्यायल्यास त्याचे आणखीही अनेक फायदे तुम्हाला होऊ शकतात. याबाबत आम्ही आज तुम्हाला माहिती (Health tips) देणार आहोत. ओव्यामध्ये (Ajwain properties) प्रोटिन्स, फॅट, फायबर आणि कार्बोहायड्रेट्स यांसोबतच कॅल्शियम, थायमिन, रायबोफ्लेविन, फॉस्फरस, आयर्न आणि नियासिन असे बरेच गुणकारी घटक भरपूर प्रमाणात असतात. तर दुसरीकडे मेथीच्या बियांमध्ये (Fenugreek seeds properties) आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरस, प्रोटीन आणि व्हिटॅमिन मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. हे दोन्ही पदार्थ पाण्यासोबत मिसळून प्यायल्यामुळे त्याचे बरेच फायदे आपल्याला मिळतात. झी न्यूज ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. असं करा मेथी-ओव्याचं पाणी यासाठी (How to prepare Methi-Ajwain water) तुम्हाला मेथीच्या बिया आणि ओवा रात्रभर पाण्यात भिजत ठेवावा लागेल. सकाळी हेच पाणी गाळून तुम्ही प्यायचं आहे. अधिक फायद्यांसाठी आणि चवीसाठी तुम्ही यात मध आणि लिंबूही मिसळू शकता. वाचा :  पोटाचे विकार दूर ठेवण्यासाठी हे फळ आहे उपयोगी; वाचा सर्व फायदे हिवाळ्यात विशेष फायदा हिवाळ्यात व्हायरल फ्लू होण्याचं प्रमाण अधिक असतं. सर्दी-पडशाचे रुग्ण आपल्याला घरोघरी दिसून येतात. मेथी-ओव्याचं पाणी (Methi-Ajwain water benefits) नियमित प्यायल्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. यामुळे सर्दी-पडसं आणि व्हायरल फ्लू होण्याचा धोकाही कमी होतो. चरबी कमी करण्यास होते मदत जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहात, तर दररोज सकाळी रिकाम्यापोटी मेथी-ओव्याचं पाणी प्यायल्याने तुम्हाला अधिक फायदा होईल. हे पाणी शरीरातील फॅट वेगाने बर्न (Speed up fat burn) करण्यास मदत करते. यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी वेगाने कमी होते. वाचा :  थंडीच्या दिवसात रोज एक केळ खाण्याचे आहेत जबरदस्त फायदे, जाणून घ्या योग्य वेळ पचन सुधारतं रोज सकाळी रिकाम्यापोटी मेथी-ओव्याचं पाणी प्यायल्यामुळे पचनशक्ती सुधारण्यासही मदत होते. यामध्ये असणाऱ्या नैसर्गिक औषधी घटकांमुळे ॲसिडिटी, पचन आणि पोटाच्या इतर समस्याही (Digestion problems home remedies) दूर होतात. मधुमेहावरही आहे गुणकारी मेथी-ओव्याचं पाणी हे मधुमेहासारख्या (Diabetes) गंभीर आजारांवरही गुणकारी आहे. याच्या नियमित सेवनानं ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहण्यास (Tips to control High blood sugar) मदत होते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना याचा विशेष फायदा होतो. सध्या हिवाळा सुरू आहे. अशात आपण योग्य ती खबरदारी घेतली नाही, तर ते आजारांना निमंत्रण ठरू शकतं. अशा सोप्या घरगुती उपायांचा वापर करून आपण आपली रोगप्रतिकार शक्ती आणखी मजबूत करू शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या