Home /News /lifestyle /

पोटाचे विकार दूर ठेवण्यासाठी हे फळ आहे उपयोगी; वाचा सर्व फायदे

पोटाचे विकार दूर ठेवण्यासाठी हे फळ आहे उपयोगी; वाचा सर्व फायदे

Health benefits of dragon fruits : हे फळ कार्बोहायड्रेट्सचा उत्तम स्रोत आहे. एका ड्रॅगन फ्रूटमध्ये 22 ग्रॅम कर्बोदके असतात. याशिवाय 13 ग्रॅम साखरही असते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ड्रॅगन फ्रूटमध्ये फॅट नसते. त्यामुळे हृदयरोग्यांसाठी ड्रॅगन फ्रूट अत्यंत उपयुक्त आहे. ड्रॅगन फ्रूटच्या बिया देखील खूप फायदेशीर आहेत.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 15 डिसेंबर : अनेकजण ड्रॅगन फ्रूटला (Dragon fruit) चीनचे फळ असे मानतात, पण तसे नाही. ड्रॅगन फ्रूटचे मूळ मेक्सिकोमध्ये असल्याचे सांगितले जात असले तरी आज हे फळ आता जगाच्या वेगवेगळ्या भागात घेतले जाते. ड्रॅगन फ्रूट हायलोसेरस नावाच्या कॅक्टसवर वाढते. हे फळ गुलाबी बल्बसारखे दिसते. ड्रॅगन फ्रूट हे पोषक तत्वांनी युक्त फळ आहे. याच्या खाण्याचे अनेक फायदे आहेत. एका ड्रॅगन फ्रूटमध्ये 102 कॅलरी ऊर्जा असते. हे फळ कार्बोहायड्रेट्सचा उत्तम स्रोत आहे. एका ड्रॅगन फ्रूटमध्ये 22 ग्रॅम कर्बोदके असतात. याशिवाय 13 ग्रॅम साखरही असते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ड्रॅगन फ्रूटमध्ये फॅट नसते. त्यामुळे हृदयरोग्यांसाठी ड्रॅगन फ्रूट अत्यंत उपयुक्त आहे. ड्रॅगन फ्रूटच्या बिया देखील खूप फायदेशीर आहेत. ड्रॅगन फ्रूट पाचन तंत्राला मजबूत बनवते. याच्या बियांमध्ये ओमेगा-3 आणि ओमेगा-9 फॅटी अॅसिड्स आढळतात, ज्यामुळे हृदयाच्या पेशी मजबूत होतात. जाणून घेऊया ड्रॅगन फ्रूटचे इतर कोणते (Health benefits of dragon fruits) फायदे आहेत. ड्रॅगन फ्रूटचे फायदे वृद्धत्व रोखण्यात मदत वेबएमडीच्या बातमीनुसार, ड्रॅगन फ्रूटमध्ये फ्लेव्होनॉइड्स, फेनोलिक अॅसिड आणि बीटासायनिन्स सारखे अँटीऑक्सिडंट्स आढळतात, ज्यामुळे वृद्धत्वाचा प्रभाव कमी होण्यास मदत मिळते. हे फळ खाल्ल्याने फ्री रॅडिकल्समुळे होणारे पेशींचे नुकसान टळते. फ्री रॅडिकल्समुळे अकाली वृद्धत्व आणि कर्करोग देखील होऊ शकतो. आतड्यांमधील निरोगी जीवाणूंचे पोषण ड्रॅगन फ्रूटमध्ये प्रीबायोटिक गुणधर्म असतात. प्री-बायोटिक म्हणजे ते आतड्यातील चांगल्या जीवाणूंना पोषण पुरवते, ज्याला प्रोबायोटिक्स असेही म्हणतात. म्हणजेच ड्रॅगन फ्रूट हे निरोगी जीवाणूंसाठी अन्न म्हणून काम करते. आतड्यात निरोगी जिवाणूंची संख्या खूप जास्त असेल तर पचनसंस्थेला खूप चालना मिळते. प्रीबायोटिक्स वाईट जीवाणू नष्ट करताना चांगल्या जीवाणूंच्या वाढीस प्रोत्साहन देतात. चांगले बॅक्टेरिया मजबूत असतील तर पोटात रोगास कारणीभूत विषाणू देखील वाढू शकत नाहीत. हे वाचा - सिंगापूर शहरातील एका मेट्रो स्टेशनला धोबीघाट नाव का दिलं? कारण, वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल रक्तातील साखर ड्रॅगन फ्रूट रक्तातील साखर कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. संशोधकांच्या मते, ड्रॅगन फ्रूटमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट स्वादुपिंडातील खराब झालेल्या पेशींची दुरुस्ती करतात. स्वादुपिंड निरोगी असेल तर इन्सुलिन हा हार्मोनही योग्य प्रकारे तयार होतो. इन्सुलिन रक्तातील साखरेचे विघटन करून त्याचे ऊर्जेत रूपांतर करते. इन्सुलिन कमी झाल्यास साखरेचे आजार होतात. प्रतिकारशक्ती वाढते ड्रॅगन फ्रुटमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा गुणधर्म असतो. कारण त्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन-सी आणि अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट असतात. हिवाळ्यात ड्रॅगन फ्रूटचे सेवन केल्याने विशेष फायदा होतो. हे वाचा - कडाक्याच्या थंडीनं गारठलं पंजाब, येत्या 3 दिवसांत या राज्यात येणार थंडीची लाट, हवामान खात्याचा इशारा कोलेस्ट्रॉल कमी ड्रॅगन फ्रुटमध्ये फॅट अजिबात नसतात. त्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित राहते. ड्रॅगन फ्रूटचे सेवन वजन नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. (सूचना: या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या