मुंबई, 01 ऑक्टोंबर : सततच्या ताण-तणावाचा आपल्या झोपेवर (Sleep) सर्वात जास्त परिणाम होत असतो. चांगल्या झोपेच्या अभावामुळं मानसिक थकवाही जाणवतो. त्याचा आपल्या हृदयावरही (Heart) परिणाम होतो. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, रात्री किमान 7 आणि जास्तीत जास्त 10 तासांची झोप खूप महत्त्वाची आहे. चांगली झोप झाल्यानंतर शरीर स्वतःला ताजंतवानं करतं तसंच, छोट्या-मोठ्या शारीरिक आणि मानसिक तक्रारीही बऱ्या केल्या जातात. परंतु गेल्या काही दशकांत लोकांची झोप दोन तासांनी कमी झाल्याचं अनेक अभ्यासांमधून आढळून आलंय. एवढंच नाही तर, चांगल्या झोपेच्या अभावामुळं लोकांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यताही वाढलीय. झोप न येण्याचं कारण बदलती जीवनशैली, मोबाईल, खाण्या-पिण्यातील बदल हे असल्याचं सांगितलं जात आहे. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या मते, आपलं शरीर निरोगी ठेवण्यासाठी झोप खूप महत्त्वाची आहे. एका निरोगी प्रौढ व्यक्तीसाठी, रात्री किमान 7 तासांची झोप हृदयरोग होण्यापासून रोखू शकते. सीडीसीच्या मते, दर तीन अमेरिकन लोकांपैकी एक जण झोप व्यवस्थित नसण्याच्या समस्येनं ग्रस्त आहे. ही समस्या एखाद्या दिवसासाठी असेल तर ठीक आहे. परंतु ती अनेक दिवस सुरू राहिली तर, यामुळं हृदयरोग, हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक होऊ शकतो. हे वाचा - एका नागिणीसाठी घायाळ झाले 3 साप; जबरदस्त फायटिंगनंतर मादीने…; पुढे काय घडलं पाहा VIDEO आरोग्याची होते हानी जेव्हा तुम्ही नीट झोप घेत असता, तेव्हा हृदयाचे ठोके, रक्तदाब आणि चयापचय कमी होते, ज्यामुळं हृदयाच्या स्नायूंना विश्रांतीसाठी वेळ मिळतो. पण जेव्हा असं होत नाही, तेव्हा उच्च रक्तदाब, टाइप 2 मधुमेह, लठ्ठपणाची समस्या उद्भवू शकते. या व्यतिरिक्त, नैराश्यही वाढू शकतं. प्रत्येक दहावी व्यक्ती झोप व्यवस्थित नसल्याच्या समस्येनं त्रस्त हेल्थशॉटनुसार, दहापैकी एक व्यक्ती झोपेच्या अभावामुळं ग्रस्त आहे. याचा थेट हृदयाच्या आरोग्याशी संबंध आहे. हृदय हा शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव असून ते आयुष्याच्या प्रत्येक क्षणी काम करत राहतं. 7 ते 8 तासांची झोप त्याला रिफ्रेश करण्यासाठी खूप महत्वाची असते, हे नेहमी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. हे वाचा - अरे, ही तर किरण राव! आमिर खानसोबत घटस्फोटानंतर ओळखू न येण्यासारखी झाली अवस्था चांगल्या झोपेसाठी हे करा दररोज एका ठराविक वेळी झोपा. दिवसभर अॅक्टिव्ह रहा आणि चाला. रात्री झोपण्यापूर्वी किमान दोन तास आधी खा. खोलीत अंधार आणि शांतता निर्माण करा. पलंगावर मोबाईल घेऊन झोपू नका.