ही लस वेळेआधी बाळ जन्माला येण्याचं रिस्क कमी करतं. शिवाय कोव्हीड पॉझिटीव्ह असताना जरी बाळाचा जन्म झाला तरी, त्याला कोरोनाचा धोका कमी होतो. रॉयल कॉलेज ऑफ ओब्स्टेट्रिशियन ऍन्ड गायनाकॉलॉजिस्ट डॉ. पैट ओ'ब्रायन यांच्यामते ही लस फायदेशीर आहे त्यामुळे गर्भवती महिलांनी कोरोना लशीबद्दल मना शंका बाळगू नये.
रायपूर, 09 फेब्रुवारी : आजही कित्येकांना मुलगा (baby boy) हवा असो आणि मुलगी (baby girl) नकोशी असते. मुलगा झाला की संपूर्ण रुग्णालयाला पेढे वाटून आनंद साजरा केला जातो. पण मुलगी झाली तर त्या बाळाचं कुटुंबं मात्र एखादा दुःखाचा डोंगर कोसळल्यासारखे चेहरे करून बसतात. तुम्हाला मुलगी झाल्याचा आनंद होवो की न होवो पण तुमच्या घरात मुलगी जन्मल्याचा आनंद रुग्णालय मात्र साजरा करणार आहे. छत्तीसगडच्या (chhattisgarh) श्री बालाजी सुपर स्पेशालिटी रुग्णालयानं (Shri Balaji Hospital) हा मोठा निर्णय घेतला आहे. रायपूरमध्ये (raipur) असलेल्या श्री बालाजी हॉस्पिटलमध्ये जर मुलगी जन्मली तर तिच्या कुटुंबाला रुग्णालयात खर्च माफ केला जाणार आहे. आयएएस ऑफिसर अवनीष शरण यांनी आपल्या ट्विटरवर ही माहिती दिली आहे. त्यांनी रुग्णालयाच्या या निर्णयाचं कौतुक केलं आहे.
रायपूरच्या बालाजी रुग्णालयात मुलगी जन्मली तर रुग्णालयात एकही रुपया द्यावा लागणार नाही. उत्तम पाऊल, रुग्णालयाशीसंबंधित सर्वांचे आभार. असं ट्वीट त्यांनी केलं आहे. हे वाचा - ‘पहिल्या प्रेग्नन्सीत जे झालं ते आता नाही…’, प्रसूतीआधी करीना कपूर झाली व्यक्त या रुग्णालयात मुलगी जन्मली तर तिच्या कुटुंबाकडून उपचाराचा एकही रुपया न घेण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासानानं घेतला आहे. सिझेरियन किंवा नॉर्मल डिलीव्हरी झाली तरीदेखील कोणतंच बिल आकारलं जाणार नाही. 15 फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल. हे वाचा - पिल्लाला वाचवण्यासाठी मगरीच्या जबड्यात गेली आई; मन हेलावणारा VIDEO 15 फेब्रुवारीला श्री बालाजी हॉस्पिटलला 12 वर्षे पूर्ण होत आहेत आणि त्याच निमित्तानं रुग्णालयानं हा उपक्रम राबवण्याचं ठरवलं आहे. मुलींचा जन्मदर वाढावा. मुलींना तितकंच महत्त्व दिलं जावं जितकं मुलांना दिलं जातं. यासाठीच या रुग्णालयानं पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचं सर्व स्तरातून कौतुक होतं आहे.