Depression and sadness
नवी दिल्ली, 12 जून : प्रत्येक व्यक्तिच्या जीवनात उतार-चढ हे सुरूच असतात. पण काही जणांना आपल्या जीवनाविषयी फार तक्रारी असतात. त्यांच्या जबाबदाऱ्या त्यांना जड होऊ लागतात. याच तणावात ते आपल्या आयुष्यातील आनंद, उत्साह हरवून बसतात व नेहमी आपल्याच विचारांत बुडालेले असतात. आणि सतत विचार करूण त्यांना ओव्हरथिंकिंग सारखी समस्या निर्माण होते. कालांतराने ते या समस्येचे म्हणजेच अतिविचार करण्याने ओव्हरथिंकिंग चे शिकार बनतात. त्यामुळे सतत एखाद्या विचारात बुडल्याने तुम्ही आजारी पडू शकता. Overthinking तुमच्या दैनंदिन जीवनावरही परिणाम कारक ठरू शकते. पिंकविला (Pinkvilla) या डिजीटल वृत्तवाहिनीच्या रिपोर्टनुसार अतिविचार केल्याने मनात नकारत्मक विचार येण्याची शक्यता असते. जे तुमच्या मेंदूवर भावनिक आघात करतात ज्यामुळे सगळ काही संपल्याची भावना निर्माण होते. अशाप्रकारे सतत नकारात्मक विचार आल्याने प्रत्येक गोष्ट नकारात्मक दृष्टीने पाहण्याची सवय होते व सकारात्मकता आणि आनंदी जीवन जगण्यापासून तुम्हाला परावृत्त करते. याचा परिणाम असा होतो की प्रत्येक गोष्टीत तुम्ही आशावादी होण्याऐवजी निराशावादी होता. काही उपाय तुम्हाला या ओव्हरथिंकिंग आणि नकारात्मक विचारांतून बाहेक काढू शकतात. होळी साजरी करताय? हे नियम नक्की पाहा अन्यथा होऊ शकते मोठी कारवाई! अपूर्ण कामे पूर्ण करा काहीजण या ओव्हर थिंकिंग पासून वाचण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपाच्या उपायांचा आधार घेतात. त्यामुळे काही काळासाठी समाधान मिळाले तरी दिर्घकाळासाठी ते उपयुक्त नसतात. ओव्हर थिंकिंग मधे ध्याम केंद्रित करणे अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ नको त्या गोष्टींमधे वाया न घालवता योग्य ठिकाणी वापर करा. तुमची अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी तो वेळ सार्थकी लावा. अस्वस्थता समजून घ्या जेव्हा तुम्ही ओव्हर थिंकिंग मधे बुडालेले असता तेव्हा तुम्ही तुमचं ध्यान तुमच्या आवडीच्या गोष्टींमधे वळवू शकता. गायन, वादन, नृत्य, वाचन या गोष्टींखेरीज जेवन बनवणे, गाणी ऐकणे, मालिका पाहणे, लिहीणे यांमधे रमू शकता. यापद्धतीने तुम्ही तुमच्या मेंदूला सक्रिय ठेऊ शकता. तुमच्या धैयाविषयी विचार करा संपूर्ण दिवस विचारांमधे हरवून जाण्यापेक्षा एक निश्चित वेळ ठरवून त्यावेळी आपल्या धैयावर लक्ष केंद्रित करा व त्यावर वितार करा. तब्येतीची काळजी घ्या ओव्हरथिंकिंग एकातांत जास्त हानिकारक असते. त्यामुळे जास्त ताणतणाव देणाऱ्या गोष्टींपासून दूर रहा. त्यासाठी दिवसभरातील काही वेळ हा मेडीटेशन साठी द्या. संध्याकाळी बाहेर चालण्यासाठी जा ज्यामुळे निसर्गातील शांतता तुमच्यापर्यंत पोहोचेल. वर्तमानावर लक्ष द्या जेव्हा तुम्ही नकारात्मक गोष्टींचा विचार करता तेव्हा त्या नकारात्मकतेच कारण शोधण्याचा विचार करा. नकारात्मकतेला डोक्यातून काढून टाका. भविष्यात काय घडेल यावर वेळ वाया न घालवता वर्तमान काळावर लक्ष द्या.