पणजी, 19 जानेवारी: तृणमूल काँग्रेस (TMC) ने मंगळवारी 'गोवा विधानसभा निवडणूक 2022' साठी 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. राज्यसभा खासदार (TMC Goa Rajya Sabha MP) लुइझिन्हो फालेरो (Luizinho Faleiro) यांना फातोर्डा विधानसभा मतदारसंघातून (Fatorda constituency) उमेदवारी देण्यात आली आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख विजय सरदेसाई (Goa Forward chief Vijay Sardesai) हे फातोर्डा विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार (MLA) आहेत. आमदार सरदेसाई हे मनोहर पर्रीकर यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे आता फातोर्डा विधानसभा मतदार संघातील निवडणूक चुरस निर्माण झाली आहे.
गोव्यातील टीएमसीचे राज्यसभा खासदार आणि माजी मुख्यमंत्री लुइझिन्हो फालेरो हे फातोर्डा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी गेल्यावेळी नवेलीम मतदार संघातून निवडणूक लढवली होती. पण त्यांना यावेळी फातोर्डा येथून पक्षानं उमेदवारी जाहीर केली आहे. याठिकाणी त्यांना गोवा फॉरवर्ड पार्टीचे प्रमुख विजय सरदेसाई याचं कडवं आव्हान आहे. सरदेसाई यांच्या पार्टीने अलीकडे काँग्रेस पार्टीशी युती केली आहे. त्यामुळे याठिकाणी त्यांची ताकद आणखी वाढली आहे.
हेही वाचा-UP Opinion Poll: भाजप 235 जागांसह सत्ता राखण्याचा अंदाज
गोव्यातील कर्ली क्लब पाडण्यास सुरुवात; याच क्लबमधील पार्टीनंतर झालेला सोनाली फोगटचा मृत्यू
गोव्यात पुन्हा एकदा धक्कादायक घटना, रिसॉर्टमध्ये डच महिलेसोबत भयंकर घडलं
संतापजनक! मुंबईत कोरियन मुलीच्या छेडछाडीनंतर गोव्यात विदेशी महिलेसोबत थेट..
मुंबईतून गोवा, कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी, लवकरच वाहतूक कोंडी संपणार
Goa Politics : काँग्रेस सोडलेले गोव्याचे 7 आमदार अमित शहांच्या भेटीला, मोठ गिफ्ट मिळणार?
आता गोव्यात 'काय हाटील, काय डोंगर'चं सत्र सुरू! काँग्रेस आमदारांना चेन्नईला हलवलं
Goa Tourism : गोवा फिरण्यासाठी जातायेत? 'या' ठिकाणी होईल मोफत राहण्याची सोय
घरात न सांगता व्हॅलेटाईन साजरा करण्यासाठी प्रेमी युगुल गोव्याला गेलं अन् परत आलेच नाहीत
पोटात गर्भ वाढत असताना पतीने थेट पत्नीवर घातल्या गोळ्या…, कारण ऐकून बसेल धक्का
मुलीनं केली कमाल! मायक्रोसॉफ्टनं दिलं बंपर पॅकेज; 8-10 लाख नव्हे सॅलरीचा आकडा बघून व्हाल थक्क
Airplane Emergency Landing : गोवा-हैदराबाद विमानात अचानक धुराचे लोट; Emergency लँडिंग, धक्कादायक VIDEO
तसेच लुइझिन्हो फालेरो आणि विजय सरदेसाई हे आधीपासून एकमेकांचे कडवे शत्रू राहिले आहेत. त्यामुळे यावर्षीची फातोर्डा येथील निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. असं असताना टीएमसी नेते लुइझिन्हो फालेरो हे आपल्या पक्षाच्या या निर्णयावर नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. फालेरो यांना त्यांच्या संमतीशिवाय आणि कोणतीही चर्चा न करता फातोर्डा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. फालेरो यांना कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी मिळणार याबाबत त्यांना कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नसल्याचं, जवळच्या सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.
हेही वाचा-BREAKING: मुलायम सिंह यादवांच्या सुनेनं घेतला सपाशी काडीमोड, भाजपात प्रवेश
त्यामुळे फालेरो हे आपल्या पक्षाच्या निर्णयावर नाराज आहे. येत्या काही काळातच ते याबाबत प्रतिक्रिया देण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोवा विधानसभा निवडणुकीत आणखी काय ट्विस्ट येणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. तूर्तास पक्षाकडून दिलेल्या जागेवर फालेरो यांनी निवडणूक लढवली, तर याठिकाणी मोठी चूरस पाहायला मिळणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.