JOIN US
मराठी बातम्या / गोवा / Goa Election : गोव्यात शिवसेनेचा महाविकास आघाडीचा प्लॅन फसला, काँग्रेसने दुरूनच दाखवला 'हात'!

Goa Election : गोव्यात शिवसेनेचा महाविकास आघाडीचा प्लॅन फसला, काँग्रेसने दुरूनच दाखवला 'हात'!

गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीने भाजपला टक्कर देण्यासाठी रणनीती आखली होती.

जाहिरात

उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून उस्मानाबादेत महा विकास आघाडीमध्ये फूट पडल्याचे चित्र आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

गोवा, 18 जानेवारी :  गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Goa Election 2022) रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. शिवसेनेनं (shivsena) गोव्यात महाविकास आघाडीचा प्रयोग करण्याची चाचपणी केली होती. पण काँग्रेसने शिवसेना (congress) आणि राष्ट्रवादीचा (ncp) प्रस्ताव फेटाळला आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या स्वप्नावर पाणी फेरले गेले आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा हा प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यामुळे गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीने भाजपला टक्कर देण्यासाठी रणनीती आखली होती. शिवसेनेनं काँग्रेससोबत बोलणीही केली होती. पण काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून कामाला लागली आहे. गोव्यात काँग्रेसचे अनेक भागात वर्चस्व असून ताकदही आहे. त्यामुळे भाजपला टक्कर देऊ शकते, असं काँग्रेसचे प्रवक्ते आणि गोवा मीडिया प्रभारी रत्नाकर पांडे यांनी सांगितलं. ( ऐश्वर्या-धनुष घटस्फोटानंतर बहिणीची ट्विटर पोस्ट चर्चेत, थलायवाला फॅन्सचा सपोर्ट ) 2017 गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता.  2017 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. पण भाजपने काँग्रेसचे अनेक आमदार फोडले होते आणि सरकार स्थापन केले होते. या निवडणुकीत मतदानाचे टक्केवारी ही 83 टक्के होती. या निवडणुकीत काँग्रेसने 36 जागांवर निवडणूक लढवली होती. यात काँग्रेसने सर्वाधिक 17 जागा जिंकल्या होत्या. ज्या बहुमतापासून फक्त ४ जागा दूर होत्या. तर भाजपने सुद्धा 36 जागांवर निवडणूक लढवली होती. पण 13 जागांवर भाजपला विजय मिळवता आला होता. गोवा फॉरवर्ड पार्टी जीएफपी ही 4 जागांवर निवडणूक लढली होती आणि 3 जागा जिंकली होती. तर आम आदमी पक्ष हा 40 जागांवर लढला होता पण एकही जागा जिंकता आली नव्हती. त्यामुळे भाजपला चांगले माहिती आहे की त्यांची लढत थेट काँग्रेससोबत आहे. त्यामुळे भाजप कोणतीही संधी सोडणार नाही. ( घटस्फोट मृत्यूपेक्षाही भयानक’,‘महाभारत’ फेम नितीश भारद्वाज यांचा खुलासा ) तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड गोव्यात दाखल झाले आहे. आपल्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा करत असून शिवसेनेसोबत एकत्र निवडणूक लढवण्यावर निर्णय घेणार आहे. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 40 जागा आहे. यात बहुमतासाठी एकूण 21 जागांची गरज लागणार आहे.  या निवडणुकीत अनेक पक्ष आपले नशीब आजमावत आहे. पण गोव्यातील जनता यंदा कुणाच्या पारड्यात आपले मत टाकणार आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या