मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

ऐश्वर्याच्या घटस्फोटानंतर सौंदर्याने बदलला Profile Pic, वडील Rajinikanth यांच्यासह असणाऱ्या फोटोवर कमेंट्सचा पाऊस

ऐश्वर्याच्या घटस्फोटानंतर सौंदर्याने बदलला Profile Pic, वडील Rajinikanth यांच्यासह असणाऱ्या फोटोवर कमेंट्सचा पाऊस

साउथ सुपरस्टार धनुष आणि थलायवा रजनीकांत यांची कन्या ऐश्वर्या यांच्या घटस्फोटानंतर रजनीकांत यांची कन्या सौंदर्यानं (Soundarya) शेअर केलेला एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोवर कमेंट्सचा (Comments) अक्षरशः पाऊस पडला आहे.

मुंबई, 18 जानेवारी: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतला आघाडीचा अभिनेता धनुष (Dhanush and Ashwarya Rajinikanth Divorce) आणि ऐश्वर्या रजनीकांत यांनी नुकतीच विभक्त होत असल्याची घोषणा केली. यामुळे फॅन्सना धक्का बसला आहे. नागा चैतन्य आणि समंथा (Naga Chaitanya and Samantha Divorce) यांनी काही महिन्यांपूर्वी विभक्त होण्याची घोषणा केली होती. त्याची चर्चा सुरु असतानाच धनुष आणि ऐश्वर्यानं घेतलेला हा निर्णय फॅन्ससाठी धक्कादायक आहे. त्यातच दिग्गज अभिनेते रजनीकांत यांची कन्या सौंदर्यानं (Soundarya) शेअर केलेला एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोवर कमेंट्सचा (Comments) अक्षरशः पाऊस पडला आहे. वडील रजनीकांत आणि बहिण ऐश्वर्यासोबत असलेला हा फोटो सौंदर्यानं ट्विटर प्रोफाइलला (Twitter Profile) अपडेट केला आहे. हा फोटो पाहून चाहते भावुक झाले आहेत. अभिनेता धनुष आणि ऐश्वर्या हे दोघं सुमारे 18 वर्षांपूर्वी विवाहबंधनात अडकले होते. आपण विभक्त होत असल्याची घोषणा सोमवारी धनुषनं सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून केली. या पोस्टमध्ये धनुषनं लिहिलं आहे, की '18 वर्षांचा सहवास, मैत्री, कपल, पालक आणि एकमेकांचे हितचिंतक बनत आम्ही समजूतदारपणे एकत्र प्रवास केला. आज आम्ही जिथे उभे आहोत, तिथे आमचे मार्ग वेगळे होत आहेत. मी आणि ऐश्वर्यानं विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. एकमेकांपासून वेगळे होऊन आम्ही स्वतःला शोधू. कृपया आमच्या निर्णयाचा आदर करा आणि आमची प्रायव्हसी लक्षात घेऊन, आम्हाला हे सर्व हाताळू द्या.' हे वाचा-Lovestory: अशी झाली होती धनुष आणि रजनीकांत यांच्या मुलीची पहिली भेट दुसरीकडे, सौंदर्यानं तिच्या ट्विटर प्रोफाइलवर वडील रजनीकांत आणि ऐश्वर्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या प्रोफाइल फोटोवर फॅन्सनी कमेंट्स केल्या आहेत. काही युझर्स या कमेंट्समध्ये 'रजनीकांत यांनी खंबीर राहावं,' असा सल्ला देत आहेत. काही युजर्स 'ही घटना एका पित्यासाठी दुःखदायक आहे,' अशा कमेंट्स करत आहेत. 'या कठीण काळात फोटोमध्ये रजनीकांत हसताना दिसत असले, तरी त्यांच्या मनातलं दुःख सर्वांना माहिती आहे', असं एका चाहत्यानं कमेंटमध्ये लिहिलं आहे. काही युजर्स अभिनेता धनुषवर नाराज झाल्याचं दिसून येत आहे. 'या वयात रजनीकांत यांना इतकं दुःख देऊ नको,' असं फॅन्सनी म्हटलं आहे. रजनीकांत यांना दक्षिणेत देवासमान मानलं जातं. मुलीच्या घटस्फोटाच्या पार्श्वभूमीवर आज प्रत्येक जण रजनीकांत यांच्या सोबत असल्याचं चित्र आहे. केवळ दक्षिण भारतातच नाही, तर जगभरात रजनीकांत यांचे चाहते आहेत. रजनीकांत यांना चाहते अशा पद्धतीनं फॉलो करतात, की त्यांना नुसतं पाहिलं तरी ते भावूक होतात. चित्रपट असो अथवा सोशल मीडिया अकाउंट, रजनीकांत यांची छबी पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. त्यामुळे थलायवाच्या या थ्रोबॅक फोटोवरही हजारो कमेंट्स येत आहेत.
First published:

Tags: Rajnikant, Superstar rajnikant

पुढील बातम्या