Home /News /entertainment /

'घटस्फोट मृत्यूपेक्षाही भयानक', IAS पत्नीपासून विभक्त झालेल्या 'महाभारत' फेम नितीश भारद्वाज यांची पहिली प्रतिक्रिया

'घटस्फोट मृत्यूपेक्षाही भयानक', IAS पत्नीपासून विभक्त झालेल्या 'महाभारत' फेम नितीश भारद्वाज यांची पहिली प्रतिक्रिया

अभिनेते नितीश भारद्वाज (Nitish Bhardwaj) 'महाभारत' (Mahabharat) या पौराणिक मालिकेमुळे घराघरात पोहोचले होते. यामध्ये त्यांनी श्रीकृष्ण (shree Krishna) ही अजरामर भूमिका साकारली होती.

    मुंबई, 18 जानेवारी-   अभिनेते नितीश भारद्वाज   (Nitish Bhardwaj)   'महाभारत'    (Mahabharat)  या पौराणिक मालिकेमुळे घराघरात पोहोचले होते. यामध्ये त्यांनी श्रीकृष्ण   (shree Krishna)  ही अजरामर भूमिका साकारली होती. आजही लोक त्यांना याच भूमिकेसाठी विशेष ओळखतात. सध्या नितीश भारद्वाज आपल्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी आपल्या पत्नीसोबत घटस्फोट घेतला असून त्याचं दुःख काय असतं, याबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. अभिनेते नितीश भारद्वाज यांनी नुकताच बॉम्बे टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत याबद्दलचा खुलासा केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं, 'हा हे खरं आहे. मी 2019 मध्ये मुंबईच्या कौटुंबिक न्यायालयात घटस्फोट अर्ज दाखल केला होता. ही केस सध्या सुरूच आहे. आम्ही का घटस्फोट घेतला याचं कारण तर मी नाही सांगणार. परंतु हा हे सत्य आहे, 'घटस्फोट मृत्यूपेक्षासुद्धा भयानक असतं. कारण तुम्हाला तुमच्या तुटलेल्या हृदयासह एकटं राहावं लागतं'. याबद्दल बोलताना नितीश यांनी पुढं म्हटलं, 'माझा लग्न या कॉन्सेप्टवर पूर्ण विश्वास आहे. परंतु याबाबतीत मी कमनशिबी आहे. एका लग्नाच्या अयशस्वी होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. कधीकधी तडजोड न करण्याची वृत्तीसुद्धा यामागचं कारण असू शकतं. तर कधी कधी एखाद्यामध्ये भावनांची कमतरता हेसुद्धा कारण असू शकतं. तर कधी अहंकार आणि इतरांचा विचार न करता फक्त स्वतः वरच प्रेम करणं हेसुद्धा यामागचं कारण असू शकतं'. (हे वाचा:Lovestory: अशी झाली होती धनुष आणि रजनीकांत यांच्या मुलीची पहिली भेट) 'परंतु एखादं कुटुंब जर विभक्त होत असेल, तर त्याचा सर्वात जास्त परिणाम त्यांच्या मुलांवर होतो. त्यामुळे त्या आई वडिलांनी आपल्या मुलांवर आपल्या निर्णयाचा कमीत कमी परिणाम कसा होईल याकडे लक्ष देणं महत्वाचं आहे'. यावर त्यांना विचारण्यात आलं, की घटस्फोट नंतर तुम्ही तुमच्या  मुलींच्या नेहमी संपर्कात राहणार का? यावर उत्तर देत ते म्हणाले, 'मी माझ्या मुलींना भेटण्यासाठी आणि त्यांच्यासोबत बोलण्यासाठी सक्षम आहे की नाही? ही गोष्ट मला माझ्यापुरती मर्यादित ठेवायची आहे'. असंही त्यांनी म्हटलं आहे. अभिनेते नितीश भारद्वाज यांनी 2005 मध्ये IAS अधिकारी स्मिता गाते   (Smita Gate)  यांच्यासोबत लग्न केलं होतं. त्यांनी तब्बल 14 वर्षे संसार केला आहे. त्यांना दोन जुळ्या मुली आहेत. या दोन्ही मुली सध्या स्मिता यांच्यासोबत इंदोरमध्ये राहात आहेत.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Entertainment, Tv actor

    पुढील बातम्या