JOIN US
मराठी बातम्या / गोवा / "भाजप गोव्यात नोटांचा पाऊस पडतंय, पण फडणवीस गोव्यात गेले अन् भारतीय जनता पक्षच फुटला" : संजय राऊत

"भाजप गोव्यात नोटांचा पाऊस पडतंय, पण फडणवीस गोव्यात गेले अन् भारतीय जनता पक्षच फुटला" : संजय राऊत

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यात पुन्हा भाजपच येणार असल्याचा दावा केल्यावर त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जाहिरात

"भाजप गोव्यात नोटांचा पाऊस पडतंय, पण फडणवीस गोव्यात गेले अन् भारतीय जनता पक्षच फुटला"

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 जानेवारी : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका (Assembly Elections 2022) जाहीर झाल्या असून राजकीय वातावरणही चांगलेच तापल्याचं पहायला मिळत आहे. उत्तरप्रदेश (Uttar Pradesh), गोव्यात (Goa Assembly Election 2022) आपलीच सत्ता पुन्हा येणार असल्याचा दावा भाजपचे नेते करत आहेत. भाजप नेत्यांच्या या विधानावर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांकडून प्रतिक्रिया येत आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गोव्यात पुन्हा भाजपच येणार असल्याचा दावा केल्यावर त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. फडणवीस गोव्यात गेल्यावर भारतीय जनता पक्षही फुटला शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातून गोव्यात गेले आहेत. आणि आपण पाहिलं असेल की, देवेंद्र फडणवीस गोव्यात गेल्यावर भारतीय जनता पक्षही फुटला. काल एक मंत्री मायकल लोबो यांनी पक्षाचा त्याग केला. प्रविण झांट्ये यांनीही पक्ष सोडला. त्यामुळे त्यांनी आधी पक्षांतर्गत जे काही युद्ध सुरू आहे ती लढाई लढावी.” महाराष्ट्रातून गोव्यात नोटांच्या बॅगा चालल्या… संजय राऊत पुढे म्हणाले, आची लढाई गोव्यात खरोखर नोटांशीच आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते ज्या प्रकारे तिकडे नोटांचा पाऊस पाडत आहेत विशेष करुन महाराष्ट्रातून ज्या काही नोटांच्या बॅगा चालल्या आहेत त्यामुळे शिवसेनेसारखा पक्ष त्या नोटांशी नक्की लढेल आणि गोव्याच्या जनतेला सांगण्याचा प्रयत्न करेल की या नोटांच्या दबावाखाली येऊ नका. वाचा :  पवार पंतप्रधान कधी होतील? चंद्रकांत पाटलांचा राऊतांना खोचक सवाल तुम्ही कितीही नोटा टाका… शिवसेना हा सामान्यांचा, बहुजनांचा, हिंदुत्ववादी पक्ष आहे. शिवसेना पक्ष हा भाजपच्या नोटांना पुरून उरेल हे नक्की आहे. देवेंद्र फडणवीस यांना माझा शब्द आहे की तुम्ही कितीही नोटा टाका तुमच्या नोटांशी आम्ही लढू असंही संजय राऊत म्हणाले. सत्तेत येणाऱ्या पक्षांना कधी गळती लागत नाही जे काही ओपिनियन पोल येत आहेत त्यानुसार, उत्तरप्रदेशात भाजप पुन्हा सत्तेत येईल असं म्हटलं जात आहे. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. सत्तेत येणाऱ्या पक्षांना कधी गळती लागत नाही. मंत्री पक्ष सोडत नाहीत, आमदार पक्ष सोडत नाहीत आणि प्रमुख कार्यकर्तेही पक्ष सोडत नाहीत. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की, उत्तरप्रदेशचा राजकीय प्रवास हा परिवर्तनाच्या दिशेने सुरू आहे असंही संजय राऊत म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या