तसंच, या दोन्ही महापुरुषांना खरोखरच ज्योतिष्य अवगत असेल, तर त्यांनी गोवा, उत्तर प्रदेशाबद्दल बोलण्यापेक्षा महाराष्ट्राबाबत भविष्य सांगावं. राऊत यांनी सांगावं की, शरद पवार पंतप्रधान कधी होतील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर कधी पडतील, याची भविष्यवाणी पवारसाहेबांनी करावी' असा टोला पाटील यांनी लागवला. 'नावापुरताच महाविकास असणारे हे सरकार प्रत्यक्षात मात्र महाविरोधाभास सरकार आहे. दोन वर्षांपासून ठप्प असलेले जनजीवन आता सुरळीत होत होते. त्यावर निर्बंध लावू नयेत असे राज्यातील जनता ओरडून ओरडून सांगत होती, परंतु या सरकारने आपला मनमानी कारभार राबवत विरोधाभासी प्रतिबंध लादले आहेत' अशी टीकाही पाटील यांनी केली. ('Taarak Mehta..' फेम मिसेस सोढीच्या रिअल लाईफ पतीने सुशांतसोबत केलंय काम) 'हे सरकार जनता झोपलेली असताना संचारबंदी लावते, पण दिवसा लोकल्स, बसेस तुडुंब गर्दी भरून वाहत असतात. मॉल्स, रेस्टॉरंट्स, बार, ऑफिसेस अशा वातानुकूलित जागांना परवानगी मिळते, परंतु शारीरिक व मानसिक विकासासाठी आवश्यक असणाऱ्या विद्यालये, क्रीडांगणे इ. जागांवर मात्र प्रतिबंध लादले जातात. राज्यातील सर्वसामान्य जनतेला या सरकारमधील गोंधळाचा नाहक त्रास भोगावा लागत आहे, परंतु सरकार मात्र कुंभकर्णाची झोप घेत असून सर्वसामान्यांचा आवाज त्यांच्या कानी पोहोचलाच नाही. या महाविकास आघाडी सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? हा प्रश्न आज उभा महाराष्ट्र विचारत आहे' अशी टीकाही पाटील यांनी केली.ज्योतिष्य, कर्मकांड नाकारणारे @PawarSpeaks आणि प्रबोधनकारांचा वारसा सांगणाऱ्या शिवसेनेचे खा.@rautsanjay61 भविष्यवेत्ते कधी झाले? उत्तर प्रदेश, गोव्यात सत्ता परिवर्तनाबाबत दावे समजू शकतो, पण छातीठोक भविष्यवाणी हे मनोरंजन आहे.
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) January 11, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Chandrakant patil, चंद्रकांत पाटील